शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

Kolhapur Crime: बालिंगा दरोड्यातील चौघे मध्य प्रदेशातील, शोधासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 3:55 PM

अटकेतील दोघांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी

कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीतील चार दरोडेखोर मध्य प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. पसार असलेला स्थानिक संशयित कोपार्डे (ता. करवीर) गावचा असून, या पाच जणांच्या अटकेसाठी पोलिस पथकांचे प्रयत्न सुरू आहेत.अटकेतील संशयित सतीश सखाराम पोहाळकर (वय ३७, रा. कणेरकर नगर, फुलेवाडी, कोल्हापूर) आणि विशाल धनाजी वरेकर (वय ३२, रा. कोपार्डे) या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांची गुरुवारपर्यंत (दि. १५) पोलिस कोठडीत रवानगी झाली.दरोड्यानंतर पसार असलेल्या पाच संशयितांपैकी चौघे मध्य प्रदेशातील आहेत. त्यातील एक संशयित एका गुन्ह्यात कळंबा कारागृहात होता. कारागृहातून मिळालेल्या त्याच्या माहितीच्या आधारावरून त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्याच्या मागावर पथके पोहोचल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या अटकेनंतरच गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे पोलिसांच्या हाती लागणार आहेत.कात्यायनी ज्वेलर्सचीच निवड का?दरोड्याचा मुख्य सूत्रधार पोहाळकर स्वत: सराफ व्यावसायिक असल्यामुळे त्याला कात्यायनी ज्वेलर्सच्या व्यवसायाची माहिती होती. या ज्वेलर्समध्ये दागिने मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय रोकडही मोठ्या प्रमाणात हाती लागू शकते, अशी पोहाळकरला खात्री होती. कात्यायनी ज्वेलर्सकडे ग्राहकांचा ओढा असल्यामुळे पोहाळकरचा व्यवसाय नुकसानीत होता. या दोन्ही कारणांमुळे त्याने दरोड्यासाठी कात्यायनी ज्वेलर्सचीच निवड केली, अशी माहिती तपासात समोर आली.

प्रत्यक्ष दरोड्यापासून दूर राहण्याचा स्थानिकांचा प्रयत्न

दरोड्यात एकूण सात जणांचा सहभाग होता. त्यापैकी चौघे मध्यप्रदेशातील होते. तिघा स्थानिकांनी प्रत्यक्ष दरोड्यात सहभाग घेतला नाही. मात्र, दरोड्याचा कट रचण्यापासून ते पळून जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्याचे काम या तिघांनी केले. दरोड्याचा प्लॅन अयशस्वी ठरला तर आपला सहभाग समोर येऊ नये, याची खबरदारी पोहाळकर आणि वरेकरने घेतली होती. मात्र, पोलिसांच्या तपासात त्यांचा भ्रम दूर झाला.परप्रांतीय एकत्र की वेगवेगळे?दरोड्याचा सूत्रधार पोहाळकर आणि वरेकर यांनी परप्रांतीय दरोडेखोरांना पुणे-बंगळुरू महामार्गावर कात्रजजवळ सोडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर चौघे एकत्रच पुढे गेले की वेगवेगळ्या दिशांनी गेले याची माहिती नाही. ते वेगवेगळ्या दिशांना गेले असल्यास त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस