शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेत हजारो मासे तडफडले, पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 12:58 IST

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कसबा बावडा : दूषित पाण्यामुळे ऑक्सिजन कमी पडल्याने कसबा बावडा येथील पंचगंगा नदीपात्रात हजारो माशांची तडफड होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे पंचगंगा प्रदुषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  असे प्रकार होत राहिल्यास प्रदुषणामुळे पंचगंगेतील जलचर नष्ट होण्याची भीती पर्यावरण तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कसबा बावड्यातील मळी परिसरातील नदीपात्रात हजारो माशांचे थवे अगदी संथगतीने तरंगताना आढळून आले. दूषित पाण्यामुळे हा प्रकार झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या जरी दिसत असले तरी पाणी तपासणीचा अहवाल आल्यानंतरच याचे खरे कारण कळू शकेल असे स्पष्टीकरण शिवाजी विद्यापीठातील पर्यावरण विभागाकडून देण्यात आले.सध्या पंचगंगा नदी राजाराम बंधाऱ्याजवळही प्रदूषित झाल्याचे दिसते. पाण्याला काळसर, हिरवट रंग काही प्रमाणात आला आहे. ज्या ठिकाणी मासे तरंगताना दिसले तिथेही पाण्याचा रंग काळपट हिरवट आहे. नदीतील हजारो मासे तरंगतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गुरुवारी येथे प्रदूषण महामंडळाच्या व मत्स्य व्यवसायाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. अर्जुन जाधव म्हणाले, नेमके मासे कशामुळे तरंगले हे आताच सांगू शकत नाही. सध्या पाण्याचा नमुना घेतला आहे. तो विद्यापीठाकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत त्याचा अहवाल येईल. त्यानंतर नेमकी परिस्थिती समजेल.

ऑक्सिजन कमी पडू शकल्याने, वातावरणातील नैसर्गिक बदल, माशांच्या शरीरामध्ये बदल होऊ शकतात, पाण्यातील काही नैसर्गिक बदल, दूषित पाणी, वॉटर बेड (पाण्यात काहीतरी कुजण्याची घटना घडणे) आदी कारणांमुळे मासे तरंगू शकतात, असे मत्स्य व्यवसाय सहाय्यक विकास अधिकारी सतीश खाडे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण