शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील सीपीआरमध्ये होणार पहिले सरकारी आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 16:19 IST

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सीपीआरमध्ये पहिले सरकारी ...

कोल्हापूर : येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सीपीआरमध्ये पहिले सरकारी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी केंद्र होणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून राज्यात पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही सेवा मोफत राहणार आहे.गेल्या काही वर्षांत वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली, विवाहाचे वाढते वय, वाढता स्थूलपणा यासह अन्य कारणांमुळे अपत्यप्राप्तीसाठी नवदाम्पत्यांसमोर अनेक अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक खासगी रुग्णालयांनीही आयव्हीएफ, टेस्ट टयूब बेबी सेंटर्स सुरू केली असून भारतभर असलेल्या साखळी रुग्णालयातील केंद्रेही कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत; परंतु ही उपचार प्रणाली महागडी आहे. या उपचाराचा भाग असलेल्या एका सायकलसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च येतो. काही वेळा पहिल्या प्रयत्नात यश येत नाही.यासाठी काही जादा सायकल्स कराव्या लागतात. त्यामुळे साहजिकच हा खर्च वाढत जातो.एकीकडे वंध्यत्वामुळे घरासह समाजातून मारले जाणारे टोमणे, त्यामुळे होणारी नवरा-बायकोची मानसिक घुसमट आणि यासाठीचा मोठा खर्च यातून सुटका होण्यासाठी आता सीपीआरमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पहिल्या सरकारी आयव्हीएम, टेस्ट ट्यूब बेबी केंद्राचा दिलासा मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur CPR to Launch First Government IVF, Test Tube Center

Web Summary : Kolhapur's CPR hospital will soon offer free IVF and test-tube baby services, a first for a government institution in the state. This initiative, driven by Minister Hasan Mushrif, aims to alleviate the financial burden and social stigma associated with infertility treatments, providing hope to many couples.