प्रशांत कोरटकर'वर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहील; अटकेनंतर इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 20:11 IST2025-03-24T20:08:55+5:302025-03-24T20:11:12+5:30
Prashant Koratkar Arrested: प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रशांत कोरटकर'वर कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहील; अटकेनंतर इंद्रजित सावंतांची प्रतिक्रिया
Prashant Koratkar Arrested: इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसापासून फरार आहे. दोन दिवसापूर्वा प्रशांत कोरटकर देश सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. प्रशांत कोरटकर याला पोलिसांनीअटक केली आहे. पोलिसांनी तेलंगणा येथून कोरटकर याला ताब्यात घेतले आहे. यावर आता इंद्रजित सांवत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला अटक; तेलंगणातून पोलिसांनी घेतले ताब्यात
इंद्रजित सावंत म्हणाले, अशा चिल्लर माणसाने पोलिसांना तंगवातंगवी केली ही मोठी गोष्ट आहे. एक महिना सर्व शिवप्रेमी कोरटकरला अटक करण्याची मागणी केली. मात्र, कोरटकरला पाठिंबा दिला त्यांचे आभार
पोलिसांनी चांगले काम केले, असंही इंद्रजित सावंत म्हणाले.
"वकिलांनी चांगली बाजू मांडली. विकृत व्यक्तीला अटक केली याचे समाधान आहे,या कोरटकरला कायदेशीर कारवाई होईपर्यंत लढाई सुरू राहील. उच्च न्यायालयातही जामीन नाकारला आहे. त्याच्याकडे आता पर्याय नव्हता. तांत्रिक पुरावे जे आहेत ते पोलिसांकडे जमा केले आहेत.
या लोकशाहीत त्याच्यावर कारवाई होईल, यावर माझा विश्वास आहे, असंही इंद्रजित सावंत म्हणाले.
"प्रशांत कोरटकरला कोण मदत करत होतं, तो महिनाभर कुठे होता?, असा सवालही सावंत यांनी केला. कोल्हापुरातील कोणत्या अधिकाऱ्यांची मदत तो घेत होता हे समोर यायला पाहिजे. त्याला वाचवणारी यंत्रणा कार्यान्वित होती त्याचा शोध घ्यावा. वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याचा चेहरा समोर आला पाहिजे, ती प्रवृत्ती कोण हे समोर आले पाहिजे, अशी मागणीही सावंत यांनी केला.
इंद्रजित सावंत म्हणाले, सुनावणीच्या एक तास अगोदर अटक झाली, हा योगायोग आहे की ठरवून आहे हे समोर आले पाहिजे, असा संशय सावंत यांनी व्यक्त केला. जो सत्य इतिहास बाहेर काढला जातो, त्याला विकृत मंडळी कडून त्रास दिला जातो, असंही सावंत म्हणाले.
महाराजांवर खालच्या थरात जाऊन बोलतात त्यांच्यावर कारवाई व्हावी
इंद्रजित सावंत म्हणाले, आम्ही सत्य इतिहास सांगतो, कागदपत्रे जे बोलतात ते आम्ही सांगतो, स्वतःच सांगत नाही.पण काही विकृत माध्यमातून बोलतात, समोर कधी येत नाहीत. महाराष्ट्रात कोणतेही सरकार आले तर ते शिवप्रेमी असतात.पण छत्रपती शिवाजी महाराजांवर खालच्या थरात जाऊन बोलतात त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली.