शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चिकूच्या कुळातील ‘एग फ्रुट’ वृक्षाची कोल्हापुरात प्रथमच नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:17 IST

कोल्हापुरात प्रथमच हा वृक्ष आढळल्याने त्याची नव्याने नोंद करण्यात येत आहे.

कोल्हापूर : कोल्हापुरातील रत्नाप्पा कुंभारनगर मोरेवाडी परिसरात शशिकला राणे यांच्या घराच्या कुंपणाबाहेर आंब्यासारखी फळे लागलेला वृक्ष वृक्षप्रेमी परितोष उरकुडे यांना निरीक्षण करताना नजरेस पडला. या वृक्षाची शास्त्रीय ओळख वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पटवली असून, हा एग फ्रुट विदेशी वृक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र कोल्हापुरात प्रथमच हा वृक्ष आढळल्याने त्याची नव्याने नोंद करण्यात येत आहे.शशिकला राणे यांनी कांही वर्षांपूर्वी या वृक्षाचे रोप कालिकत येथून आणले होते. हे रोप आंबा आणि फणस यांची संकरित जात होती, अशी माहिती रोपवाटिका मालकाने दिल्याचे उरकुडे यांना राणे यांनी सांगितले. याच्या फळांफुलांचे, फांद्यापानांचे फोटो त्यांनी डॉ. बाचूळकर यांच्याकडे पाठविले तेव्हा संदर्भग्रंथातून या वृक्षाची ओळख त्यांनी पटविली.

‘एग फ्रुट’ या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विदेशी वृक्षाचे नाव पाउटेरिया कॅम्पिचिएना असे असून, हा चिकूच्या म्हणजेच सॅपोटेएसी कुळातील आहे. याला यलो सॅपाटी, कपकेक फ्रुट व कॅनिस्टेल अशीही नावे आहेत. हा मूळचा मध्य अमेरिकेतील मेक्सिकोमधील आहे. याचे वृक्ष सॅल्वाडोर, गौतेमाला या जंगलांत नैसर्गिकपणे वाढतात. फळांसाठी याची लागवड कोस्टारिका, ब्राझिल, अमेरिका, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, फिलिपाइन्स, श्रीलंका तसेच आपल्याकडे केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोव्यात करण्यात आली आहे.म्हणूनच त्याला ‘एग फ्रुट’ म्हणतात‘एग फ्रुट’ हा लहान ते मध्यम आकाराचा सदाहरित वृक्ष दहा मीटरपर्यंत उंच वाढतो. फांद्या पसरणाऱ्या व काही खाली झुकलेल्या असतात. पाने साधी, एकाआड एक, टोकाकडे एकवटलेली रुंद, व्यस्त अंडाकृती आकाराची, देठाकडे अरुंद व गोलसर असतात. पाने खुडल्यावर पांढरा चीक येतो. फुले लहान, द्विलिंगी, फिकट पिवळसर व मळकट तपकिरी रंगाची, सुवासिक असतात. बेचक्यातून एकांडी व गुच्छाने येतात. पाकळ्या पाच ते सहा, एकमेकांस चिकटलेल्या असून, त्यावर रेशमी लव असते.

फळे गोलाकार व देठाकडे फुगीर तर पिकलेली फळे नारिंगी, पिवळसर रंगांची असतात. आतील गर पिवळसर असून, फळात दोन ते सहा काळसर, करड्या रंगाच्या लांबट, गोलाकार बिया असतात. त्या हुबेहूब चिकूच्या बियांप्रमाणे दिसतात. पिकलेली फळे, उकडून टरफल काढलेल्या अंड्याप्रमाणे होतात, म्हणूनच त्याला ‘एग फ्रुट’ म्हणतात. याच्या बियांपासून रोपनिर्मिती होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfruitsफळे