Kolhapur: अखेर हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटविण्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांची मूक निदर्शने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:27 IST2025-01-11T12:26:15+5:302025-01-11T12:27:20+5:30

तानाजी घोरपडे हुपरी : येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसा जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी ...

the demolition of the controversial madrasa in Hupari begins, silent protests by Muslim brothers | Kolhapur: अखेर हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटविण्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांची मूक निदर्शने 

Kolhapur: अखेर हुपरीतील वादग्रस्त मदरसा हटविण्यास सुरुवात, मुस्लिम बांधवांची मूक निदर्शने 

तानाजी घोरपडे

हुपरी : येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसा जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी कागदपत्रे मुस्लिम सुन्नत जमियतने नगरपरिषद प्रशासनाला सादर न केल्याने प्रशासनाने या मदरसाचे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही आज, शनिवारी सकाळपासून सुरू केली आहे. दरम्यान ही कारवाई थांबविण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजातील नागरिकानी हातात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा घेवून काही काळ शांततेत मूक निदर्शने केली. शहरात जागोजागी मोठ्याप्रमाणात पोलिस बंदोबस्त आहे. 

शहरांतील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी मालमत्ता क्रमांक ४४८९ या मिळकतीवर मुस्लिम सुन्नत जमियतने बेकायदेशीररित्या उभारलेल्या मदरसा जमिनीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवाना व इतर अनुषंगिक कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नगरपरिषद प्रशासनाने मुस्लिम सुन्नत जामियतला बजावली होती. मात्र मुस्लिम सुन्नत जामियतने शेवटपर्यंत कागदोपत्री पुरावा सादर केलाच नाही. तसेच सरकारी गायरानावरती बेकायदेशीररित्या मदरसाचे बांधकाम केले असल्याचे शासकीय कागदपत्रातून व आत्तापर्यंतच्या न्यायालयीन लढाईतून सिद्ध झाल्याने प्रशासनाने शनिवारी हा वादग्रस्त मदरसा हटविण्याची कारवाई केली. 

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे - चौगुले, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलिस निरिक्षक एन आर चौखंडे यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त आहे. 

Web Title: the demolition of the controversial madrasa in Hupari begins, silent protests by Muslim brothers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.