शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

हवाई अंतर कमी करणे कारखानदारीच्या मुळावर, नेमका फायदा काय हे स्पष्ट होण्याची गरज 

By विश्वास पाटील | Updated: June 17, 2023 13:41 IST

शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.

विश्वास पाटीलकोल्हापूर : दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची २५ किलोमीटरची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीच्या मुळावर उठणारी आहे. दोन्ही काँग्रेसच्या वर्चस्वाखाली असलेल्या साखर कारखानदारीत आता निम्मे कारखाने भाजपचे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच या निर्णयास विरोध होऊ शकतो. शेतकरी संघटनांतील वर्चस्वाच्या राजकारणात साखर कारखानदारीचे वांगे होईल, असा आग्रह धरणे चुकीचे आहे.रयत शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. त्यांनी त्यांच्या स्वभावानुसार समिती नेमण्याची घोषणा करून टाकली आहे. परंतु, सध्याच्या महाराष्ट्रातील साखर हंगामाचा विचार केल्यास कितीही ऊस झाला तरी कधीही गाळपाविना ऊस शिल्लक राहिला अशी स्थिती उदभवलेली नाही. मागील दहा वर्षांत फक्त २०२१-२२ च्या हंगामातच सरासरी गाळप १७३ दिवस झाले आहे. सोलापूर, अहमदनगर व मराठवाड्यात चांगला पाऊस झाला की त्यावर्षी गाळप दोनशे टक्के वाढते व पावसाने ओढ दिल्यास ते पन्नास टक्क्यांवर येते. तसे या हंगामात झाल्याने गाळप वाढले. तो अपवाद वगळता कधीच १५० पेक्षा जास्त गाळप झालेले नाही. सरासरी १६० दिवस कारखाना सुरू राहिला तरच तो आर्थिकदृष्ट्या परवडतो. अन्यथा तब्बल २७५ दिवस कायम कामगारांचा पगाराचा बोजा सहन करावा लागतो. हंगाम कितीही दिवस चालला तरी त्याच्या मेंटेनन्ससाठी येणारा खर्च तेवढाच असतो. प्रत्येक जिल्ह्यातील दोन-तीन कारखाने बंद असूनही एकही टन ऊस शिल्लक राहत नाही. नजिकच्या काळात कोणत्याच जिल्ह्यात नव्या सिंचन योजना होणार नसल्याने ऊस क्षेत्र वाढणार आहे, अशीही स्थिती नाही. उसाची पुरेशी उपलब्धतता नसताना मग नुसतेच कारखाने वाढवण्यात मागणी करणाऱ्यांचा व शासनाचाही काय फायदा आहे हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

मागील हंगामातील सरासरी गाळप दिवसकोल्हापूर : १२४, पुणे : १३२, सोलापूर : ११८, अहमदनगर : १२१, औरंगाबाद : १२४, नांदेड : ११७, अमरावती -९६ आणि नागपूर-१०० :

महाराष्ट्रातील साखर उद्योगाची सद्य:स्थितीसहकारी साखर कारखाने - १०६खासगी कारखाने - १०४प्रतिदिन गाळप क्षमता : ८ लाख ८२ हजार ५५०.एकूण ऊस गाळप : १० कोटी ५२ लाखसाखर उत्पादन : १ कोटी ५३ लाख टनसरासरी गाळप दिवस : १२१

हवाई अंतराची अट शिथिल करण्याची मागणी साखर कारखानदारीस मारक आहे. एकेकाळी 180 दिवस चालणारा साखर हंगाम आता कसा बसा 100 दिवसावर आला आहे.. अनेक कारखाने गाळप क्षमता वाढवत आहेत. सहकारी साखर कारखानदारी नेहमीच स्पर्धात्मक राहिली आहे. त्यामुळे आत्ता हवाई अंतर कमी करून कारखाने वाढवल्यास चांगले चाललेले कारखाने ऊसा अभावी अडचणीत येतील. - समरजीत घाटगे, अध्यक्ष, शाहू साखर कारखाना, कागल

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने