शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

जनगणनेला सुरुवात होणार; पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण, कोल्हापूर जिल्ह्यात कधीपासून...जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 18:20 IST

Census 2027: काम वेळेत, अचूक करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर : जलद आणि अचूक जनगणनेसाठी ग्रामीण भागातील महसुली हद्द विचारात घेऊन ७०० ते ८०० लोक किंवा १८० ते २०० घरांचा एक गट तयार करावा. शहरी भागात प्रगणकांनी विभागानुसार (वॉर्डनुसार) लोकसंख्या मोजावी. १० फेब्रुवारीपासून प्रगणक गट तयार करण्याच्या कामाला सुरुवात करा. काम दिलेल्या वेळेत व अचूकपणे पूर्ण करा, जनगणनेची माहिती चुकीची असल्याचे आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गुरुवारी दिला.केंद्र शासनाच्या फेब्रुवारी २०२७ पासून जनगणनेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी आयोजित संबंधित अधिकाऱ्यांच्या एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या उपविभागीय अधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, इचलकरंजीचे उपविभागीय अधिकारी दीपक शिंदे, जनगणना सहायक संचालक अजय ठाकूर, जिल्हा समन्वयक मयूर पवार, उपसंचालक (सांख्यिकी) सीमा अर्दाळकर, करमणूक कर अधिकारी तेजस्विनी पाटील, करवीरचे तहसीलदार स्वप्निल पवार, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, जनगणना कार्यक्रम दोन टप्प्यांमध्ये असून पहिल्या टप्प्यात घरांची यादी करणे आणि घरगणना करणे अपेक्षित आहे. फेब्रुवारी २०२७ पासून जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातील व्यक्तीनिहाय गणना केली जाईल. जनगणनेसाठी माहिती संकलित करताना कोणताही भाग सुटू नये अथवा त्या भागाची पुनरावृत्ती होऊ नये याची विशेष दक्षता घ्यावी, निवडणूक कार्यक्रमानंतर प्रशिक्षणांसह प्रत्यक्ष कामाला अधिक गती देण्यात येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Census Preparation Begins: Training Underway in Kolhapur District, Details Inside

Web Summary : Kolhapur district is preparing for the 2027 census. Teams are forming, training is underway, and officials emphasize accuracy. District Collector Amol Yedge warned of accountability for errors during the data collection process. The focus is on comprehensive and precise enumeration.