Crime News kolhapur: कोरोचीत शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 11:39 IST2022-05-27T10:55:14+5:302022-05-27T11:39:32+5:30
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

Crime News kolhapur: कोरोचीत शेतात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
शहापूर : तारदाळ रोड कोरोची ( ता. हातकणंगले ) येथील कुंथीनाथ सांगले यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एका ५५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबतची माहिती पोलीस पाटील सावकार हेगडे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तारदाळ मार्गे जाणाऱ्या रोड लगत आत एक किलोमीटर वर आतील शेतात हा मृतदेह आढळला. त्या मृतदेहाचा चेहरा सडला असून ओळख पटने मुश्कील बनले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.