शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : वसंतराव मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:08 IST

शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अकार्यक्षम असल्याने रोज एक अपहाराचे प्रकरण उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.

ठळक मुद्देशेतकरी संघाचे संचालक मंडळ बरखास्त करा : वसंतराव मोहिते शिष्टमंडळाने केली जिल्हा उपनिबंधकांकडे मागणी

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाचे संचालक मंडळ अकार्यक्षम असल्याने रोज एक अपहाराचे प्रकरण उघड होत आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज काढल्याने संघ आर्थिक अरिष्टात सापडल्याने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी संघाचे माजी अध्यक्ष वसंतराव मोहिते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांच्याकडे केली.गेल्या वर्षभरात शेतकरी संघाच्या सात शाखांत अपहाराच्या घटना घडल्या आहेत. अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई न करता मिटवामिटवी केल्याने अपहार बोकाळल्याचे वसंतराव मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले. संघावर एक रुपयांचे कर्ज नव्हते, पण या मंडळींनी ८ ते १० कोटींचे कर्ज केले आहे. संचालकच संघाच्या धोरणांची पायमल्ली करत असून लाखो रुपयांचा उधारीवर मालाची उचल केली आहे.

संघाच्या मोक्याच्या जागा आपल्या मर्जीप्रमाणे कोणतीही जाहिरात न देता भाड्याने दिल्या आहेत, त्यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. एकूणच संघाचा कारभार चिंताजनक असून संस्थेच्या हिताला घातक आहे. सततच्या अपहाराच्या प्रकारामुळे अकार्यक्षम संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी सभासदांमधून होत आहे.

संस्थेचे हित आणि सभासदांच्या मागणीचा विचार करून संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासकांची नियुक्ती करावी. त्याचबरोबर गेल्या चार वर्षांत केलेल्या कारभाराची सखोल चौकशी करून संघाचे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करून घ्यावे, अशी मागणी वसंतराव मोहिते यांनी केली.यावर, तक्रारीनुसार संघाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी अ‍ॅड. अशोकराव साळोखे, माजी संचालक सुरेश देसाई, प्रभातराव माने (भादोले), वसंत पाटील (वडणगे), संघाचे माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते, विजय पोळ आदी उपस्थित होते.सभासदांबाबत २५ नोव्हेंबरला सुनावणीशेतकरी संघाचे २३ हजार जुने सभासद विद्यमान संचालक मंडळाने कमी केले आहेत. विरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी होऊन अंतिम सुनावणी २५ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुरेश देसाई यांचे सभासदत्वही रद्द केले आहे, त्यास त्यांनी आव्हान दिले असून त्याची सुनावणीही यावेळी होणार आहे.परवानगीशिवाय नोकरभरतीपरवानगीशिवाय नोकरभरती करू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले असताना तो धुडकावत भरती केल्याचे मोहिते यांनी निदर्शनास आणून दिले.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर