शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार विद्यार्थी सोमवारी रस्त्यावर

By admin | Updated: February 26, 2015 00:47 IST

‘शैक्षणिक व्यासपीठ’तर्फे आयोजन

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकर शोधून फाशी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) शहरातील सर्व शाळांमधील दहा हजार विद्यार्थ्यांच्या मोर्चाचे आयोजन केल्याची माहिती ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. गांधी मैदानातून सकाळी साडेआठ वाजता हा मोर्चा निघेल.पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना लवकर शोधावे व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी सोमवारी (दि. २) ‘शैक्षणिक व्यासपीठ’तर्फे मोर्चाचे आयोजन केले आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्यास सरकारने राजीनामा द्यावा; तसेच अभ्यासक्रमात भारतीय राज्यघटनेच्या विरोधातील खोटा इतिहास काढून टाकावा. दाभोलकर व पानसरे यांच्या खुनांत ज्या संघटनांचा सहभाग आहे, त्यांच्यावर कायमची बंदी घालावी, पानसरे यांचे स्मारक बनवावे; त्यामध्ये ग्रंथालय, अभ्यासिका, इतिहास संशोधन केंद्र यांचा समावेश असावा, अशा मागण्या यावेळी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात येणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता निघून महाद्वार रोड-पापाची तिकटी- महापालिका-बिंदू चौक येथे येऊन जिल्हा प्रशासनाला तिथे बोलावून मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिले जाणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना ‘शिवाजी कोण होता’ या गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या एक लाख प्रतींचे वाटप होईल. पालकांनीही सहभागी व्हावे..या मोर्चात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व पालकांनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनीच त्याबाबत आपपल्या आईवडिलांना मोर्चास येण्यासंदर्भात विनंती करण्याची सूचना करण्यात आली आहे.