दहा फूट लांब अजगर थेट हॉटेलात; सर्पमित्रांनी दिला वनविभागाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 21:04 IST2025-06-23T21:04:02+5:302025-06-23T21:04:51+5:30

परिसरात प्रथमच अजगर पकडण्यात आल्याने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

ten foot long python arrives at hotel in kolhapur | दहा फूट लांब अजगर थेट हॉटेलात; सर्पमित्रांनी दिला वनविभागाच्या ताब्यात

दहा फूट लांब अजगर थेट हॉटेलात; सर्पमित्रांनी दिला वनविभागाच्या ताब्यात

राशिवडे : कोदवडे (ता. राधानगरी) येथील हॉटेल मधून अजगर पकडण्यात आला. नर जातीचा  सुमारे दहा फूट लांब व वीस कीलो वजनाच्या अजगरास माजी सरपंच सर्पमित्र कृष्णात पोवार यांनी पकडून वन विभागाच्या ताब्यात दिले. परिसरात प्रथमच अजगर पकडण्यात आल्याने त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

आज सकाळी हॉटेल मध्ये साप आल्याची माहिती सर्पमित्र कृष्णात पोवार यांना मिळाली. त्यांनी तातडीने सापाला पकडण्यासाठी धाव घेतली. सुरवातीला घोणस जातीचा साप असेल असे समजून त्यांनी सावधगिरीने निरीक्षण केले असता त्यांना अजगर असल्याचे दिसून आले. भला मोठा अजस्त्र अजगर पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अजगरास पकडून कापडी पिशवीत घालून राधानगरी प्रादेशिक वन विभागाशी संपर्क केला. वन विभागाच्या पथकाने राशिवडे येथे येवून अजगरास ताब्यात घेत नैसर्गिक अधिवासात सोडले.

सध्या पावसाचे वातावरण व नदीनाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात व वीनीसाठी साप घरापर्यंत येत आहेत. जुनी लाकडे, जळनसाठा, गोठ्यात साप येण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र कृष्णात पोवार यांनी केले.

Web Title: ten foot long python arrives at hotel in kolhapur