नांदगाव येथे टेम्पो उलटला; अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 23:30 IST2022-02-02T23:29:11+5:302022-02-02T23:30:09+5:30
शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव, घुंगूर रस्त्यावरील एका वळणावर अवजड मालाने भरलेला आयशर टेंपो उलटून अपघात झाला.

नांदगाव येथे टेम्पो उलटला; अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
करंजफेण: शाहुवाडी तालुक्यातील नांदगाव, घुंगूर रस्त्यावरील एका वळणावर अवजड मालाने भरलेला आयशर टेंपो उलटून अपघात झाला. या अपघातात टेंपो क्लिनर राजेश गुप्ता (रा. भिवंडी, वय ३०) याचा जागीच मृत्यू झाला. तर, टेंपो चालक राजू नारायण विटकर (रा.हातवळा जि.अहमदनगर, वय ४७) जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून माल घेऊन गोव्याकडे हा टेंपो निघाला होता. रस्ता चुकल्यामुळे घुंगूर येथून ते नांदगावकडे येत असताना, नांदगाव जवळील एका वळणावर टेंपो मुख्य रस्ता सोडून खाली गेल्याने उलटला. या अपघातात जखमी राजू विटकर यांना रूग्णवाहिकेतून उपचारासाठी सी.पी.आर रूग्णालयात दाखल करण्यात आले. शाहुवाडी पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.