महामार्गावर टेम्पोला अपघात, अडीच तासांनी जखमी चालकाला काढले बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:50 PM2020-02-04T14:50:14+5:302020-02-04T14:51:56+5:30

पुणे बंगळूर महामार्गावरील कणेगाव- घुणकी (ता. हातकंणगले) दरम्यान वारणा नदीच्या पुलानजीक आयशर टेम्पो नदीजवळील भरावात सुमारे शंभर फूट खाली जाऊन झाडाला जोरात धडकल्याने टेम्पोच्या पुढील बाजूचा चक्काचुर झाला. तब्बल अडीच तासाने झाडात अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात यश आले.  

Tempo accident on Pune-Bangalore highway, injured driver pulled out after two and half hours | महामार्गावर टेम्पोला अपघात, अडीच तासांनी जखमी चालकाला काढले बाहेर

महामार्गावर टेम्पोला अपघात, अडीच तासांनी जखमी चालकाला काढले बाहेर

Next
ठळक मुद्दे पुणे-बंगलोर महामार्गावर टेम्पोला अपघात अडीच तासांनी जखमी चालकाला काढले बाहेर

किणी/कोल्हापूर : पुणे बंगळूर महामार्गावरील कणेगाव- घुणकी (ता. हातकंणगले) दरम्यान वारणा नदीच्या पुलानजीक आयशर टेम्पो नदीजवळील भरावात सुमारे शंभर फूट खाली जाऊन झाडाला जोरात धडकल्याने टेम्पोच्या पुढील बाजूचा चक्काचुर झाला. तब्बल अडीच तासांनी झाडात अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढण्यात यश आले.  

चालक गंभीर जखमी होऊन अडकला होता.  ही घटना सकाळी  दहा वाजण्याच्या  सुमारास घडली.  त्याला बाहेर काढण्यासाठी उपस्थितांचे शर्तीचे प्रयत्न करून  तब्बल अडीचतासांनी बाहेर काढण्यात यश आले. भाऊ सिताराम झरे (वय.५५ रा.पाटण, जि. सातारा) असे चालकाचे नाव आहे.

घटना स्थळावरून  मिळालेली अधिक माहिती अशी की  पुण्याहून आयशेर टेम्पो (एम.एच.११ ए.एल.०२२८) कोल्हापूरकडे भरधाव वेगाने चालला होता. वारणा नदीच्या पुलाजवळ  चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट भरावात जाऊन झाडावर जाऊन  आदळला. पुढील बाजूचा चक्काचुर झाल्याने  झाड आणि टेम्पो मध्ये चालकाचे पाय अडकले.

चालकाचा आरडाओरडा ऐकून सुरवातीस अन्य  वाहनातील प्रवाशी मदतीस धावले. मात्र चालकाचे पाय स्टेअरिंग व झाडात अडकल्याने निघाला नाही. प्रवाशासह नागरीकांनी अडीच  तासाहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पण टेम्पो झाडात घुसल्याने चालकाला बाहेर काढणं अशक्य होते. त्यानंतर ट्रँक्टरच्या सहाय्याने चालकाला बाहेर  काढण्याचा प्रयत्न झाला पण तोही असफल झाला.

बाराच्या सुमारास  क्रेन व जेसीबी  व गॅस कटर आदीचा वापर करून नागरिकांच्या मदतीने 
चालकाला बाहेर  काढण्यासाठी आले  आहेत.  ही घटना पाहणासाठी वाहने थांबत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर काही वेळासाठी  जुन्या पुलावरून दुहेरी वाहतुक सुरू ठेवली होती. 

घटनास्थळी १०८अ‍ॅब्युलन्सच्या  डॉ  प्रशांत ठाणेकर, पायलट भागवत कांबळे, हायवे गस्ती पथकाने जखमी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले आहे. 

 पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी येथील वारणानदी जवळ आयशर टेम्पोचा अपघात झाला. (संतोष भोसले)

Web Title: Tempo accident on Pune-Bangalore highway, injured driver pulled out after two and half hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.