शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

अश्रूंच्या आडून उमटला संतापाचा सूर...आॅन दि स्पॉट रिपोर्ट

By admin | Updated: January 10, 2015 00:25 IST

वेदनेचा महास्फोट--आ क्रो श क र णा ऱ्या बो थे ग्रा म स्थां च्या न सा न सा त क्रो धा चा जि ले टि न


माण तालुक्यातील बोथे येथील स्फोटानंतर अनेक ग्रामस्थ जिल्हा रुग्णालयात आले होते. त्यांनी येथे प्रसारमाध्यमांसमोर बोथे विंड फार्मविरोधात तक्रारीचा पाढाच वाचला. ‘जिलेटिन येथे ठेवू नका, असे आम्ही त्यांना अनेकदा बजावले होते; मात्र ‘काही होणार नाही आणि झाले तरी आम्ही नुकसान भरपाई देतो,’ असे सांगून त्यांनी अनेकदा विषय टाळला होता,’ असे ग्रामस्थांनी सांगितले. ‘आशिष अग्रवाल हा कंपनीचा कार्यकारी संचालक तर राजेश शर्मा येथील अधिकारी होता. त्यांनी अनेकदा कर्मचाऱ्यांवर दादागिरी केली आहे. त्यांची भाषा नेहमीच मग्रुरीची असते. पवनचक्कीचे काम संपल्यानंतरही त्यांनी येथे जिलेटिनचा साठा करून ठेवला आहे. त्यांना आम्ही याची कल्पना दिल्यानंतरही त्यांनी आमचे ऐकले नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे,’ असा संतापाचा सूर अश्रूंच्या आडून उमटला. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाल्याचे पाहणारे ग्रामस्थ दु:खावेगाने आक्रोश करतानाच या घटनेला जबाबदार असणाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत होते.

विशाल सूर्यवंशी/शेखर जाधव / केशव जाधव /
दौलत नाईक ल्ल बुध/वडूज/पुसेगाव / दहिवडी
शांत बोथे गाव जिलेटिनच्या भयानक स्फोटाने हादरले आणि पाठोपाठ झाला वेदनेचा महास्फोट. सुरुवातीला कोण, कुठे आहे याचा अंदाजच कुणाला येईना. स्फोटामुळं कुणाच्या देहाच्या चिंधड्या झालेल्या, तर कुणाचा मृतदेह दूरवर जाऊन पडलेला. ग्रामस्थ धक्क्यातून थोडे सावरले आणि जखमींना घेऊन मिळेल त्या वाहनाने साताऱ्याकडे धावले. जिल्हा रुग्णालयात सर्वत्र आक्रोश आणि एकमेकांना सावरणारी माणसं... उद््ध्वस्त वस्ती आणि उद््ध्वस्त मनं. जखमींचं वेदनेनं कळवळून ओरडणं.... कुणी कुणाला सावरायचं, हाच प्रश्न!

घरं पडलं; पण
देव्हारा शाबूत!
बुध : माण तालुक्यातील बोथे येथे शुक्रवारी झालेल्या जिलेटिनच्या स्फोटाचे हादरे सुमारे २५ किलोमीटरपर्यंत बसले. यामुळे असंख्य घरांना तडे गेले असून, कौले पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, एका घरात अजब प्रकार घडला. त्या घरावरील कौले पडल्यामुळे फ्रिजसह असंख्य मौल्यवान वस्तूंची मोडतोड झाली. पण घरातील देव्हाऱ्याला धक्काही लागला नाही. देव्हाऱ्यातील मूर्ती, तसबिरी जशाच्या तशा सुरक्षित राहिल्या. या प्रकारानंतर घरातील मंडळींनी बाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. पुन्हा घरात आल्यानंतर त्यांना देव्हारा जसाच्या तसा दिसला.


जेवत्या ताटात कौलं अन् माती
सकाळी दहा-अकराच्या दरम्यान भयंकर स्फोटाने परिसर हादरला तेव्हा पाच वर्षाची चिमुरडी सानिका जगदाळे ही नशीब बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावली
जेवत असतानाच ताटात घराची कौले पडली. फक्त काही अंतरावर असलेल्या सानिकाच्या डोक्यावर कौले पडली असती तर... या विचारानेच सानिकाच्या आजीच्या डोळ्यांत अश्रू आले.

माउलीने केली पाठीची ढाल
ज्यावेळी हा मोठा स्फोट झाला यावेळी अश्विनी चव्हाण यांनी तान्हुल्याला पाळण्यात झोपवले होते. स्फोटामुळे घर हादरायला लागले, त्यावेळी बाळाला वाचविण्यासाठी या माउलीने कसलाही विचार न करता पाळण्यावर आडवे होऊन पाठीची ढाल केली. घराची कौले पाठीवर पडल्याने दुखापत झाली; पण सहा महिन्यांचा चिमुकल्याच्या केसालाही धक्का लागू दिला नाही.


लागोपाठ दुसरा स्फोट  होतो की काय याची भीती...
जिल्हा रुग्णालयात बोथेचे माजी सरपंच विलासराव जगदाळे भेटले. माहिती देताना ते अतिशय घाबरले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला आणि आम्ही तत्काळ घराबाहेर पडून पळतच बोथेच्या डोंगराकडे धावत सुटलो. बरोबर सव्वानऊ वाजता तेथे पोहोचलो असता आमची पोरं आजूबाजूला जखमी अवस्थेत विव्हळत पडलेली होती. शशिकांत कुलकर्णी यांचा मृतदेह अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. ज्या ठिकाणी जिलेटिनचा साठा होता, त्याठिकाणी पंधरा फुटांहून अधिक खोल खड्डा पडला होता. येथून धूर येत असल्यामुळे आमचेही पुढे जायचे धाडस होत नव्हते; कारण आणखी एखादा स्फोट झाला तर करायचे काय... अशी भीतीही मनात होती. मात्र, पोरं विव्हळत पडल्याचे दृश्य पाहून थांबावेसे वाटले नाही. व्हायचे होईल ते होईल, असे मनात ठेवूनच आम्ही सर्व ग्रामस्थ पुढे गेलो आणि जखमींना उचलून सातारच्या दिशेने निघालो.’

दोघे खासगी रुग्णालयात
४बोथे जिलेटिन स्फोटातील मृत आणि जखमींना जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र, जखमींपैकी जावेद उस्मान मुलाणी आणि सूर्याजी रोहिदास शिंदे यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.सर्वप्रथम जावेद मुलाणी यांना सिध्दिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, थोड्याच वेळाने सूर्याजी शिंदे यांची प्रकृती आणखी गंभीर झाल्यामुळे त्यांनाही सातारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला गेला.

फडतरे वस्तीतील घरांना स्फोटामुळे तडे
बुध : या स्फोटाने फडतरेवस्ती व बोथे गावातील घरावरील कौले पडली असून या कौलांच्या अघाताने अनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. फडतरे वस्तीवरील अनेक घरांच्या भिंतीना तडे गेले असून या प्रकाराने अनेक नागरिकांचे नुकसान झाले आहे शंकर जगदाळे, शंकर फडतरे, संतोष कुंभार, दशरथ फडतरे, शंकर चव्हाण, शिवाजी जगदाळे, यशवंत जगदाळे यांच्या घराच्या भिंतींना तडे गेले असून, कौले ढासळली आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू असून, नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी सरपंच शिवाजी जगदाळे यांनी केली.


घरं पडलं; पण देव्हारा शाबूत!
बुध : माण तालुक्यातील बोथे येथे शुक्रवारी झालेल्या जिलेटिनच्या स्फोटाचे हादरे सुमारे २५ किलोमीटरपर्यंत बसले. यामुळे असंख्य घरांना तडे गेले असून, कौले पडली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मात्र, एका घरात अजब प्रकार घडला. त्या घरावरील कौले पडल्यामुळे फ्रिजसह असंख्य मौल्यवान वस्तूंची मोडतोड झाली. पण घरातील देव्हाऱ्याला धक्काही लागला नाही. देव्हाऱ्यातील मूर्ती, तसबिरी जशाच्या तशा सुरक्षित राहिल्या. या प्रकारानंतर घरातील मंडळींनी बाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. पुन्हा घरात आल्यानंतर त्यांना देव्हारा जसाच्या तसा दिसला.