शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक राजकारणात गुंतले अन् विद्यार्थी परीक्षेला मुकले, कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडेत घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 12:44 IST

विक्रम पाटील   करंजफेण : घुंगूर  (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन ...

विक्रम पाटील करंजफेण : घुंगूर  (ता.शाहुवाडी) येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे १८ विद्यार्थी बांबवडे येथील महात्मा गांधी विद्यालय एन . एम. एम. एस. परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आले. मात्र त्यांचे परीक्षा केंद्र कोतोली ( ता.पन्हाळा ) येथे असल्याने त्यांना या केंद्रात परीक्षा देता आली नाही. त्यामुळे १८ विद्यार्थ्यांचे वर्षेभराचे कष्ट वाया जाऊन सारथीची शिष्यवृत्ती हातून गेली. घुंगूर  हायस्कूलमधील एका कर्मचार्‍यांची पत्नी थेट सरपंचपदाच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरली होती. त्यामुळे येथील मुख्याध्यापकासह अन्य शिक्षक कर्मचारी प्रचारात गुंतले असल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रिका देखील पहायला त्यांना वेळ नसल्याचे सांगत पालकांनी याप्रकाराबाबत संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करून संबंधितावर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बांबवडे येथील केंद्रावर बांबवडे, सोनुलें, पिशवी, शित्तुरतर्फे मलकापूर या केंद्रातील विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. घुंगुरच्या विद्यालयाने सोईनुसार कोतोली केंद्राची निवड केली होती. पंधरा दिवसांपूर्वी प्रवेशपत्रिका ऑनलाईन आल्याचे केंद्र संचालकांनी संबंधित मुख्याध्यापकांना देखील कळविले होते. परीक्षेची १० वाजून २० मिनिटाची वेळ असताना आज मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षक १८ परीक्षार्थींना बांबवडे परीक्षा केंद्रावर १० वाजून २५ मिनिटांनी घेऊन आले. त्यांना कोतोली केंद्रावर जायचे होते मात्र तेथे न जाता चुकीच्या केंद्रावर पाच मिनिटे उशिरा घेऊन आले होते. १५ दिवसांपूर्वी ऑनलाईन प्रवेशपत्र दिले असतानाही मुख्याध्यापक किंवा संबंधित शिक्षकांनी व विद्यार्थी यापैकी कोणीच न पाहिल्याने हा गोंधळ झाला.केंद्रावर अतिरिक्त पेपर दिलेले असतात, पण नियम, अटी पूर्ण केल्याशिवाय त्या पेपरचे सील काढता येत नाही. विद्यार्थी चुकीच्या परीक्षा केंद्रावर उशिरा आल्याने त्यांना अतिरिक्त पेपर देता येत नाही. शिक्षकांनी काळजीपूर्वकप्रवेशपत्रिका न पाहिल्याने हा प्रकार घडला असल्याचे पं.स.शिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी सांगितले.घुंगूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता वर्गशिक्षकांना सदर विभागाचे काम सोपवले होते. दिवसभरात त्यांच्याशी संपर्क झाला नाही. शिक्षकांशी संपर्क करून विद्यार्थी, पालकांशी चर्चा करतो असे सांगण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थीexamपरीक्षाSchoolशाळाTeacherशिक्षकgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक