शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

शिक्षक बँक नोकर भरतीविरोधात मंगळवारी संप, बँक एम्प्लॉईज युनियनचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 2:09 PM

कोल्हापूर येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांनी बँकेत अनावश्यक नोकरभरतीचा घाट घातला आहे. या संचालकांच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे मंगळवारी (दि. २) एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशिक्षक बँक नोकर भरतीविरोधात मंगळवारी संपबँक एम्प्लॉईज युनियनचा निर्णय

कोल्हापूर : येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांनी बँकेत अनावश्यक नोकरभरतीचा घाट घातला आहे. या संचालकांच्या बेकायदेशीर कृत्याविरोधात बँक एम्प्लॉईज युनियनतर्फे मंगळवारी (दि. २) एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास बेमुदत संपाची हाक दिली जाणार आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याबरोबर २००० साली ‘सेवक मांड’ कराराच्या आधारे सदर नोकरभरती करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. यात १४४ कर्मचारी आवश्यक होते; परंतु २००० सालानंतर कमी झालेली सभासद संख्या व संगणक वापरामुळे रिझर्व्ह बँकेने २/३ कर्मचाऱ्यांत बँक चालेल, असे म्हटले आहे. त्याची अंमलबजावणी संचालकांनी केलेली नाही. त्यानुसार ९६ कर्मचाऱ्यांची संख्या भरते. सद्य:स्थितीत १०२ कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही नोकरभरतीचा डाव मांडला जात आहे.

एका बाजूला कर्मचाऱ्यांचे चार कोटींहून अधिक देणे देण्यास व्यवस्थापन असमर्थता दाखवीत आहे; तर दुसरीकडे बँकेवर नोकरभरतीचा बोजा लादला जात आहे. त्याचा परिणाम सभासदांच्या लाभांशवर होणार आहे. त्यामुळे संचालक स्वत:च्या स्वार्थापोटी सभासद, बँक व कर्मचारी यांच्या हिताचा बळी देत आहेत.

कर्मचाऱ्यांनी कष्टाने गतवर्षी बँक नफ्यात आणली असून सभासदांना ब ऱ्याच वर्षांनी प्रथमच लाभांश मिळाला आहे. युनियननेही ७५ कर्मचाऱ्यांचा ‘सेवक मांड ’प्रस्ताव सादर केला आहे. याचीही चर्चा नसल्यामुळे युनियनने सहायक कामगार आयुक्तांकडे धाव घेतली आहे. कर्मचारी ही नोकरभरती रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत.

सभासद हे बँकेचे मालक असल्याने त्यांनीच नेमलेल्या संचालकांना त्यांनी जाब विचारावा, असेही आवाहन दिघे यांनी केले आहे. यावेळी सचिव एन. एस. मिरजकर, सचिव प्रकाश जाधव, प्राथमिक शिक्षक बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर भालकर, आनंदा घोरपडे, अनंत कुलकर्णी, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर