शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘टिडीआर’ लाटला, हातही झाले ओले

By admin | Updated: July 19, 2015 00:26 IST

पोलिसांसमोर चौकशीचे आव्हान : अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले ; सत्य समोर येणार

कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनास बोगस कागदपत्रांच्या आधारे काही कोटींचा अतिरिक्त टीडीआर लाटून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याने याप्रकरणाशी संबंधित सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. महानगरपालिकेतील तसेच भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात आपले हात ओले करून घेतल्याचा आरोप होऊनही तत्कालीन आयुक्तांनी केवळ लाटलेला टीडीआर रद्द केला; परंतु सध्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पोलखोल करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याने नेमके सत्य बाहेर येणार आहे. अडीच वर्षांपूर्वी बोगस कागदपत्रांच्या आधारे टीडीआर लाटल्याचे प्रकरण बाहेर आले आणि महानगरपालिकेत दहा वर्षांपासून बेमालूमपणे सुरू असणारा घोटाळा बाहेर आला. तसेच टीडीआर म्हणजे काय? इथपासून सर्व माहिती पुढे आली. धैर्यशील पाडुरंग यादव या बांधकाम व्यावसायिकाने अधिकाऱ्यांना हाताशी धरून सानेगुरुजी वसाहतीजवळील रि.स.नं. १०१०/अ या जागेपैकी क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या ८० हजार चौरस फूट जागेचा टीडीआर घेण्याऐवजी दोन लाख चौरस फूट जागेचा टीडीआर घेतला होता. हे प्रकरण नगरसेवक भूपाल शेटे यांनी बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्यावर दबाव यायला लागला; परंतु त्यांनी दबावास न जुमानता या प्रकरणात कशी फसवणूक झाली याचे कागदोपत्री पुरावे दिले. तरीही तत्कालिन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिलेला टीडीआर रद्द करण्यापलीकडे कोणतीही कारवाई केली नव्हती. नगरसेवक शेटे यांनी सध्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांना हे प्रकरण समाजावून देण्याचा त्यासंबंधातील सर्व कागदपत्रे दाखविण्याचा प्रयत्न केला. शिवशंकर यांना या प्रकरणातील गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणात सहभागी असलेली एक पूर्ण साखळी हादरून गेली आहे. बोगस टीडीआर घोटाळ्याचा छडा लावण्याची ही सुरुवात आहे. (प्रतिनिधी) अनेक अधिकारी चौकशीच्या जाळ्यात या प्रकरणात महानगरपालिकेतील अनेक अधिकाऱ्याचा संबंध आला आहे. विभागीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंत्यापासून ते नगर अभियंता, उपायुक्त आणि नगररचना विभागातील सर्व्हेअरपासून सहायक संचालक इथपर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या हाताखालून धैर्यशील यादव प्रकरणाची फाईल गेली आहे. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याशिवाय भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील काही कर्मचारी, अधिकारीही या प्रकरणाशी संबंधित आहेत. जागेची मोजणी त्यांच्यामार्फ त झाली आहे म्हणूनच पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रशासकीय कारवाईही व्हावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाचा छडा लागेल, संबंधितांवर कारवाई होईल; परंतु प्राथमिक चौकशीत आढळून आलेल्या त्रुटींच्या आधारे आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रशासकीय चौकशी करून या घोटाळ्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी भूपाल शेटे यांनी केली. बाकीच्या प्रकरणांचे काय? महानगरपालिकेत २००० सालापासून आजअखेर शहरातील विविध ठिकाणांच्या २०३ जागांच्या बदल्यात किमान ८६ लाख स्क्वेअर फुटाचे टीडीआर दिले असून, ही सर्व प्रकरणेही आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. जागांचे टीडीआर दिल्यानंतर त्या जागा मनपाने ताब्यात घेण्यात उदासिनता दाखविली, अद्यापही काही जागा मूळ मालकांच्या ताब्यातच आहेत. पैकी एकही जागा विकसित केलेली नाही. काही अधिकाऱ्यांनी अधिकारात चुकीचे एस्टिमेट करून कमी पैसे भरून घेतल्याचा आरोप होतोय. धैर्यशील यादव टीडीआर प्रकरण बाहेर आल्यानंतर काही प्रकरणांच्या फाईली गहाळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याचाही शोध घेण्याची गरज आहे.