शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
4
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
5
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
6
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
7
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
8
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
9
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
10
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
11
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
12
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
14
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
15
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
16
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
17
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
18
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
19
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
20
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
Daily Top 2Weekly Top 5

तासगाव पंचायत समिती घेणार प्रज्ञाशोध परीक्षा...

By admin | Updated: January 10, 2015 00:19 IST

जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम : शाळांना नमुना पुस्तिकेचे वितरण

तासगाव : स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील गरीब परंतु गुणवंत मुले चमकावीत, या हेतूने तासगावच्या पंचायत समितीने ‘तासगाव प्रज्ञाशोध परीक्षा’ हा उपक्रम राबविण्याचा विधायक निर्णय घेतला आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेऊन न थांबता, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तक छापले आहे. विद्यार्थ्यांत पहिलीपासून स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची गोडी लागावी, नियमित अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याविषयी जाणीव निर्माण व्हावी, यासाठी सध्या पहिल्या टप्प्यात पहिलीच्या वर्गासाठी तासगाव प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात ‘टी. टी. एस’चा पॅटर्न तयार करण्यात आला आहे.
नियमित अभ्यासक्रमासोबत स्वतंत्रपणे पंचायत समिती स्तरावर अशा पध्दतीने स्पर्धा परीक्षा घेणारी तासगाव पंचायत समिती ही जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती ठरली आहे. पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने जाणीवपूर्वक या उपक्रमात सहभागी होऊन प्रत्यक्षात टी.टी.एस.चा नमुना तयार केला आहे.
खासगी शैक्षणिक संस्था, शाळा, अभ्यास केंद्रे या माध्यमातून सध्या स्पर्धा परीक्षांचे वातावरण निर्माण झाले आहे. चौथीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असतेच. चौथीपासून पुढे वेगवेगळ्या राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा घेतल्या जातात. त्यामुळे निकोप स्पर्धा निर्माण होऊन अशा पध्दतींच्या परीक्षांबाबत पहिलीपासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.
या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातील सर्व शाळांना नमुना पुस्तिका देण्यात आली आहे.
मार्च-एप्रिलमध्ये ऐच्छिक पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून पहिली व दुसरीसाठीही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील, गटशिक्षणाधिकारी पी. बी. दुर्गुळे, विमल माने, गटसमन्वयक आकाराम पाटील यांनी नुकतेच या पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. (वार्ताहर)


या प्रज्ञाशोध परीक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रथम तालुक्यातील शिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. प्रायोगिक तत्त्वावर तालुक्यातील सर्व शाळांना नमुना पुस्तिका देण्यात आली आहे. मार्च-एप्रिलमध्ये ऐच्छिक पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून पहिली व दुसरीसाठीही ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.