शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्ती ही अभिमानास्पद बाब

By admin | Updated: July 4, 2015 00:48 IST

चंद्रकांतदादा पाटील : शिरोळला तंटामुक्त विशेष शांतता पुरस्कार

शिरोळ : शिरोळ गावाला महात्मा गांधी तंटामुक्ती विशेष शांतता पुरस्कार प्राप्त झाला असून, शिरोळ गावासाठी ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. गावातील ऐतिहासिक कल्लेश्वर तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून समावेश करून तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष निधी देऊन गावाच्या वैभवात भर पडणार आहे, अशी ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.शिरोळ येथील शिवाजी चौकात महात्मा गांधी तंटामुक्त व विशेष शांतता पुरस्कार वितरण कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा देसाई होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार उल्हास पाटील उपस्थित होते.शिरोळ हे तालुक्याचे ठिकाण असून, या गावाला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही. तसेच तालुक्यातील क्षारपड जमिनीचा प्रश्न सोडवू, असेही पाटील यांनी सांगितले.प्रारंभी स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पांडुरंग माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात बोलताना उपसरपंच पृथ्वीराज यादव म्हणाले, ग्रामस्थांच्या एकीमुळे आणि पोलीस ठाण्याच्या सहकार्यामुळे तंटामुक्तीचा अभियान आम्ही पूर्ण करू शकलो. गेल्या दोन वर्षांत नऊ कोटींची विकासकामे आम्ही करू शकलो. यावेळी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी तंटामुक्त व विशेष शांतता पुरस्काराचा साडेबारा लाख रुपयांचा धनादेश तंटामुक्त समितीला प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणपतराव गावडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमिनीसाठी शासनाकडून लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नृसिंहवाडी येथील कन्यागत महापर्वकाळ हा मोठा धार्मिक सोहळा होणार असून, शासनाने विकासाचा आराखडा तयार करून भरघोस निधी प्राप्त करून द्यावा. शिरोळ गाव तंटामुक्तीकडून शांततेकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे गावच्या विकासात आता भर पडणार आहे.यावेळी सरपंच सुवर्णा कोळी, ‘दत्त’चे संचालक अनिल यादव, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, युसूफ मेस्त्री, दलितमित्र अशोकराव माने, दरगू गावडे, पंचायत समिती सदस्या अनिता माने, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी राहुल देसाई, पोलीस उपअधीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक विष्णू जगताप, पोलीस निरीक्षक वसंत बागल, माजी पोलीस निरीक्षक रवींद्र पोवार, धनपाल खोत, मधुकर पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष वैभव उगळे, सहायक निबंधक सचिन धायगुडे यांच्यासह तंटामुक्तीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. शिवाजीराव माने-देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)