शहरं
Join us  
Trending Stories
1
NDA सरकारचा फॉर्म्युला ठरला! ४ महत्त्वाची खाती भाजपाकडे, एकनाथ शिंदेंना काय मिळणार?
2
मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत
3
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?
4
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
5
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
6
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
7
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
8
काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
9
"...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार"; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
10
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
11
शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप
12
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
13
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
14
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
15
2019 मध्ये जे घडले त्याचे सूत्रधार देखील एकनाथ शिंदे; काळेंशी गळाभेटीनंतर अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट 
16
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
17
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली
18
भाजपा खासदार नारायण राणेंनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट
19
400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर
20
वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?

Kolhapur: चैनीसाठी बनावट दागिने तारण ठेवण्याचा फंडा, अनेकांना घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 1:44 PM

दिलीप चौगुले टोळीचा सूत्रधार, संगनमत करून निर्दोष लोकांच्या कागदपत्रांचा वापर 

कोल्हापूर : बनावट सोने तारण ठेवून बँकांमधून कर्जाची उचल करणाऱ्या टोळीचा सूत्रधार भामटा दिलीप गंगाराम चौगुले (रा. खोपडेवाडी, पो. मांडुकली, ता. गगनबावडा) आणि बँकेचा मूल्यांकनकार सोनार सागर अनिल कलघटगी (रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) हे दोघे असल्याचे तपासात समोर आले. त्यांनी संगनमत करून निर्दोष लोकांच्या कागदपत्रांचा वापर करून त्यांना गंडा घातला. कर्जाची रक्कम त्यांनी चैनीसाठी उडविल्याची माहिती पोलिसांनी दिली.युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखांमधील बनावट सोने तारण फसवणूक प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला दिलीप चौगुले हा सराईत भामटा आहे. कर्ज थकल्यामुळे बँका नव्याने कर्ज देत नाहीत. पैशांची गरज असल्यामुळे माझ्याकडील दागिने तुमच्या नावावर तारण ठेवून कर्ज घ्या. कर्जाची रक्कम घेऊन वेळेवर हप्त्यांची परतफेड करतो, अशी गळ तो अनेकांना घालत होता. मुलगा आजारी आहे. बायकोचे ऑपरेशन आहे. नातेवाइकांना पैशांची गरज आहे, अशी अनेक कारणे सांगत तो बनावट दागिने तारण ठेवण्यासाठी ओळखीच्या लोकांना भाग पाडत होता.कर्जदार मिळाल्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा अधिकृत मूल्यांकनकार सागर कलघटगी याच्याकडे तो कर्जदाराला पाठवत होता. संगनमताने कर्ज मंजूर करून कर्जाची रक्कम उचलली जात होती. यातील बहुतांश रक्कम दोघांनी चैन करण्यात उडविली.गुन्हा दाखल असूनही मूल्यांकनकार कसा?सोनार कलघटगी याच्यावर यापूर्वी फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. तरीही बँकेने खातरजमा न करता त्याला अधिकृत मूल्यांकनकार कसे केले? कमी कालावधीत त्याच्यावर अधिकाऱ्यांनी विश्वास कसा ठेवला? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.हप्ते थकवल्याने संशय बळावलाबनावट सोने तारण ठेवून कर्ज घेतलेल्या बहुतांश कर्जदारांनी एक-दोन हप्ते भरून पुढील हप्ते थकवले. कर्जाच्या रकमा मर्यादित असूनही हप्ते थकल्याने तपासणीत त्यांच्यावरील संशय बळावला. त्यावरून फसवणुकीचा भंडाफोड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.पतसंस्थांनाही गंडाबनावट सोने तारण ठेवून कर्ज मंजूर करणाऱ्या टोळ्या पतसंस्थांमध्येही कार्यरत आहेत. यात पतसंस्थांमधील काही अधिकारीही सामील असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्रयस्थ यंत्रणांकडून पतसंस्थांमधील तारण सोन्याची तपासणी होण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGoldसोनंfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी