वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत स्वाती शिंदेस कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:13 IST2021-02-05T07:13:08+5:302021-02-05T07:13:08+5:30

कोल्हापूर : आग्रा येथे सुरू असलेल्या २३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत मुरगुडच्या स्वाती संजय शिंदे हिने ५० ...

Swati Shindes Bronze in Senior National Women's Wrestling Championship | वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत स्वाती शिंदेस कांस्य

वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत स्वाती शिंदेस कांस्य

कोल्हापूर : आग्रा येथे सुरू असलेल्या २३ व्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत मुरगुडच्या स्वाती संजय शिंदे हिने ५० किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. शनिवारी दिवसभरात महाराष्ट्राला मिळालेले हे एकमेव पदक आहे.

मुरगुडच्या सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय कुस्ती संकुल (साई केंद्र)ची खेळाडू असलेल्या स्वातीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पहिल्या फेरीत चंदीगडच्या राणीस दुहेरी पट काढून झोळी डावावर १०-०४ च्या गुणावर मात केली. दुसऱ्या फेरीत मध्य प्रदेशची आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर शिवानी पवार हिला ढाक व दुहेरी पट काढीत ९-३ अशी मात केली. तिसऱ्या फेरीत स्वातीने उत्तर प्रदेशच्या मधूला कलाजंग डावावर १०-० अशी मात केली. कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत स्वातीने दिल्लीच्या सिमरनला मोळी डावावर ६-३ अशी गुणावर मात करीत कांस्य पदक पटकावले. या कामगिरीमुळे स्वातीची भारती कुस्ती महासंघाच्या लखनौ येथे होणाऱ्या शिबिरासाठी निवड झाली. तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दादासाहेब लवटे, सुखदेव येरुडकर, दयानंद खतकर, सागर देसाई, दर्शन वाघ, संतोष जगदाने, संजय दुधाणे, खासदार संजय मंडलिक, वीरेंद्र मंडलिक, साईचे राज्य समन्वयक चंद्रकांत चव्हाण, आण्णासाहेब थोरवत, नामदेवराव मेडके, पांडुरंग भट, डाॅ. प्रशांत अथणी यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Web Title: Swati Shindes Bronze in Senior National Women's Wrestling Championship