शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

धक्कादायक! हजारो मासे मृत झाले; स्वाभिमानीने सरकारी अधिकाऱ्याला बंधाऱ्यावरच दोरखंडाने बांधले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2020 18:47 IST

Swabimani Shetkari Sanghatna- कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याजवळ मंगळवारी दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरच्या क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवले. प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हरबड यांची सुटक केली.

ठळक मुद्देपंचगंगा प्रदूषण प्रश्नी कार्यकर्ते झाले आक्रमक दूषित पाण्यामुळे तेरवाड बंधाऱ्याजवळ हजारो मासे मृत, नागरिक संतप्त

कुरुंदवाड/कोल्हापूर:  कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याजवळ मंगळवारी दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूरच्या क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना तेरवाड बंधाऱ्यावर बांधून ठेवले.  प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हरबड यांची सुटक केली.

सचिन हरबड हे बंधाऱ्याजवळ मृत माशांचा पंचनामा करून इथल्या परिस्थितीचा अहवाल देण्यास आले होते. यावेळी संघटनेचे युवा तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांनी प्रदूषण मंडळातील प्रादेशिक अधिकारी आंधळे, उप प्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांची निलंबन करा, अशी मागणी केली. 

सचिन हरबड यांना  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याचे कठड्याला दोरखंडाच्या सहाय्याने बांधून घालून संताप व्यक्त केला. यावेळी  प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यात झालेल्या झटापटीत मध्ये काही काळ तणावाचे वातावरण बनले होते.

अखेर पर्यावरण प्रेमी उदय गायकवाड यांच्या शिष्टाईने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अशोक शिंगारे यांनी कार्यकर्त्यांना इंचलकरंजी पालिकेने नदी पात्रातील मृत मासे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करावा, टाकवडे काळ्या ओढ्यावर तीन बंधारे ७२ तासात घालून कलोरिन डोस आणि  इचलकरंजीचे मुख्याधकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर क्षेत्र  अधिकारी हरबड यांची सुटका केली.

पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यात दरवर्षीप्रमाणे मृत माशांचा खच पहायला मिळाला. नदीचे प्रदूषण झालंय, प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता माशांसह नदी काठावरील माणसाचे आरोग्य धोक्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.मंगळवारी तेरवाड बंधाऱ्याजवळ दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झालेले आढळले. काही दूषित रसायनयुक्त पाण्यामुळे तडफडत असल्याचे निदर्शनास आले होते.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिरोळ तालुका युवा अध्यक्ष बंडू पाटील, सामजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी बंधाऱ्यावर धाव घेत पाहणी केली. त्यांनी बंधाऱ्यावरील भयानक परिस्थिती पाहून प्रदूषण मंडळ तसेच संबंधित प्रशासनावर संताप व्यक्त केला त्यांनी दोन दिवसात कारवाईची मागणी केली.स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसात याकडे सबधित यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई केली नाही तर स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करणार असा इशारा दिला होता.  आंदोलनात  स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, रघू नाईक, अभिजित आलासे अमीर नदाफ आदि सहभागी झाले होते.

कोल्हापूर, इचलकरंजी, शिरोली एमआयडीसी, लक्ष्मी एमआयडीसीतील पाणी पंचगंगा नदीमध्ये जात असल्यामुळे मासे मृत पडू लागले आहेत, असा आरोप स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला. इचलकरंजी शहराचे कापसावर प्रक्रिया करणारे पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये जात असल्याचे दिसत आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.- बंडू पाटील, युवा अध्यक्ष,शिरोळ तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

टॅग्स :pollutionप्रदूषणkolhapurकोल्हापूरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना