शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देशद्रोही स्वरूपाच्या गुन्ह्याचा संशय; चौघांची चौकशी सुरू?

By admin | Updated: January 24, 2015 00:08 IST

इचलकरंजीतील प्रकार : टेलिकम्युनिकेशन व एटीसी पथकाची कारवाई

इचलकरंजी : येथील जनता चौक परिसरात असलेल्या एका साडी दुकानाच्या वरील मजल्यावर संजय नामक व्यक्तीने इंटरनॅशनल मोबाईल कॉल कटिंग करून बेकायदेशीरपणे एका ‘डीवाईस’च्या माध्यमातून त्याचा गैरवापर करत असल्याचे समजते. ही माहिती मिळाल्याने केंद्रीय डिपार्टमेंट आॅफ टेलिकम्युनिकेशनच्या अधिकाऱ्यांनी दहशतवादी विरोधी पथक (एटीसी)ला सोबत घेऊन धाड टाकली. संजयसह चारजणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे दिवसभर कसून चौकशी सुरू होती. हा गुन्हा देशद्रोहाच्या स्वरूपाचा असल्याचे समजते. त्यामुळे याबाबत पथकाने कमालीची गुप्तता पाळली आहे.येथील जनता चौक परिसरातील संजय राशीचे खडे व ज्योतिषविद्या अशी कामे करतो. साडी दुकानाच्या वरील मजल्यावर बोगस सिमकार्ड वापरून कॉल कटिंग करणारे बेकायदेशीर ‘डीवाईस’ ठेवून तेथून संजय अनेक नॅशनल व इंटरनॅशनल कॉल कटिंग करून त्याचा गैरवापर करत असल्याचे समजते. यासंदर्भातील लोकेशन शोधत टेलिकम्युनिकेशन विभागाच्या पथकाने आज, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास संजयच्या कार्यालयावर धाड टाकली. संजयने केलेला गुन्हा गंभीर व देशद्रोही स्वरूपाचा असल्याने पथकाने कोल्हापूर येथील दहशतवादी विरोधी पथकाला सोबत घेऊन कारवाई सुरू केली आहे. चारजणांना पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. गुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात नोंदवून संपूर्ण माहितीदिली जाईल, असे एटीसीचे प्रमुख अभिजित देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले. (प्रतिनिधी)