शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

टेंबलाई धान्यबाजार रस्त्यासाठी मंगळवारी पाहणी, शहर अभियंत्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:30 PM

लक्ष्मीपुरीतून टेंबलाईवाडीत स्थलांतरित झालेल्या धान्यबाजारात अवजड वाहनांना तसेच व्यापारी व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी रस्ता निर्माण करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन दिले. त्यांनी, मंगळवारी (दि. १२) या भागात पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

ठळक मुद्दे टेंबलाई धान्यबाजार रस्त्यासाठी मंगळवारी पाहणी, शहर अभियंत्यांचे आश्वासन शिवसेना करवीर तालुका शिष्टमंडळाने घेतली भेट

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतून टेंबलाईवाडीत स्थलांतरित झालेल्या धान्यबाजारात अवजड वाहनांना तसेच व्यापारी व ग्राहकांना ये-जा करण्यासाठी रस्ता निर्माण करावा, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना निवेदन दिले. त्यांनी, मंगळवारी (दि. १२) या भागात पाहणी करण्याचे आश्वासन दिले.लक्ष्मीपुरीतून टेंबलाईवाडी येथे धान्य बाजाराचे स्थलांतर झाले. टेंबलाईवाडी धान्य बाजाराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यावर टेंबलाईवाडी विद्यालय, बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या दोन शाळांसह दाट लोकवस्ती आहे. येथील रस्त्याला तीव्र उतार असल्याने वाहनावरील चालकांचा ताबा सुटून अपघाताची शक्यता आहे.

त्यामुळे हुपरी-कोल्हापूर रस्त्यावरून धान्य बाजाराकडे वळणाऱ्या रस्त्यावर मोठे वर्तुळ (सर्कल) करावे, अवजड वाहनांसह धान्य बाजारात ये-जा करणाऱ्यांसाठी रस्त्याची सोय करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू जाधव यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना दिले.यावेळी सरनोबत यांनी, मंगळवारी (दि. १२) या रस्त्याबाबत जाग्यावर जाऊन सर्व्हे करू, त्यानंतर कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात, शहरप्रमुख शिवाजी जाधव, माजी जिल्हाप्रमुख रवी चौगुले, माजी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, अवधूत साळोखे, शशी बिडकर, पोपट दांगट, दिनेश परमार, धनाजी यादव, दिलीप देसाई, आदींचा सहभाग होता. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर