सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा; राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंची शनिवारी कोल्हापुरात मैफल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:28 IST2026-03-26T18:28:20+5:302026-03-26T18:28:44+5:30
कोल्हापूर : ‘ लोकमत’च्या सांस्कृतिक कार्यक्रमातील उच्च अभिरूचीचा कार्यक्रम म्हणून ख्याती मिळवलेल्या ‘ सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ वितरण ...

सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळा; राहुल देशपांडे, प्रियांका बर्वेंची शनिवारी कोल्हापुरात मैफल
कोल्हापूर : ‘लोकमत’च्या सांस्कृतिक कार्यक्रमातील उच्च अभिरूचीचा कार्यक्रम म्हणून ख्याती मिळवलेल्या ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ वितरण सोहळा शनिवारी ( दि. २८ मार्च) येथे होत आहे. लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीमध्ये आनंद भवन ऑडिटोरियम, सायबर येथे सायंकाळी ५ वाजता हा सोहळा होईल. या शानदार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार शाहू छत्रपती उपस्थित राहणार असून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होत आहे.
प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांचे गायन आणि प्रसिद्ध बासरीवादक एस. आकाश यांच्या वादनाची मैफलही यावेळी रंगणार आहे. राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे कलेक्टिव्ह या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका वेगळ्याच वातावरणातील सुरांची मैफल ही रसिकांची उत्कंठा वाढवणारी ठरणार आहे. मुख्य प्रायोजक अदानी ग्रुप असून सेलो, एलसेव्हन ग्रुप, सॉलिटियर, एलआयसी, साई ग्लोबल ग्रुप हे सहप्रायोजक आहेत.
डिग्रजकर, मंजूषा पाटील यांचा सन्मान..
या समारंभात जयपूर अत्रौली घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित विनोद डिग्रजकर, आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्याच्या शास्त्रीय गायिका मंजूषा पाटील कुलकर्णी यांना सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे..
पासेस येथे उपलब्ध..
सर्वांसाठी या कार्यक्रमाचे पासेस ‘लोकमत’ कोल्हापूर शहर कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत. कोल्हापूरच्या रसिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
- कार्यक्रम कधी..: शनिवार दि. २८ मार्च २०२६
- वेळ : सायंकाळी ५ वाजता
- स्थळ : आनंद भवन, ऑडिटोरियम, सायबर कॅम्पस, युनिव्हर्सिटी रोड,कोल्हापूर