शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांना पाठबळ, हे कसले हिंदुत्व?, देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 11:59 IST

ज्यांनी भगव्याचे नाव घेतले पाहिजे ते आता भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांच्या पाठीशी लागले आहेत. म्हणून भगव्याचे रक्षण करण्याकरिता आम्ही मैदानात उतरलो आहोत.

कोल्हापूर : ज्यांना हिंदू समाजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे त्यांना पाठबळ देणे हे कसले हिंदुत्व, अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली. तुम्हाला जर मशिदीवरील भोंगे चालत असतील तर मग हनुमान चालीसा म्हटली तर राग का येतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.फडणवीस यांनी ‘कोल्हापूर उत्तर’च्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी जाहीर सभा घेतली. रविवारी पत्रकार परिषद घेतली व त्यामध्ये हिंदुत्वावर भर दिला. ते म्हणाले, ज्यांनी भगव्याचे नाव घेतले पाहिजे ते आता भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांच्या पाठीशी लागले आहेत. म्हणून भगव्याचे रक्षण करण्याकरिता आम्ही मैदानात उतरलो आहोत. ज्यांनी राममंदिराला विरोध केला, ज्यांनी विचारणा केली की क्या राम यहां पैदा हुअे थे इसका क्या सबूत है, यांच्याविरोधातील ही लढाई आहे.रामसेतूला विरोध करणारे, रामही काल्पनिक थे और सेतू भी काल्पनिक था, असे म्हणणाऱ्यांशी ही लढाई आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दिल्यानंतरही नरेंद्र मोदी नावाच्या वाघाने हे कलम रद्द केले. पण कुणाच्या बापाची विरोध करण्याची हिंमत झाली नाही. रक्ताचे पाट राहू दे, पण आता काश्मीरमध्ये तिरंगा लहरतोय हे आहे हिंदुत्व.शिवछत्रपतींच्या या भूमीत आल्यावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एक भलेमोठे होर्डिंग दिसायचे. ते पाहून मला ऊर्जा मिळत होती. परंतु आज तिथे ठाकरे यांच्याशेजारी सोनियाजींचा फोटो व पंजा चिन्ह पाहिल्यावर हिंदुत्वाचे नामोनिशाण मिटल्याचे दिसून आले. भगव्याचे रक्षण करण्यासाठी भाजप मैदानात आहे. ही लढाई व्यक्तीची नाही तर विचारांची आहे. या सर्वाचा काश्मीर फाइल्सलाही विरोध आहे. कारण यामध्ये त्यावेळचे सत्य मांडलंय असेही ते म्हणाले.सनातन हिंदू धर्म की जयजाहीर सभेचा समारोप करताना फडणवीस यांनी मुठी आवळून सनातन हिंदू धर्म की जय, रामभक्त हनुमान की जय... सियावर रामचंद्र की जय.. बजरंग बली की जय.. अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना