कोल्हापुरात दिवसभर ऊन अन् रात्री जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 11:43 IST2025-09-19T11:42:47+5:302025-09-19T11:43:14+5:30

कोल्हापूर : शहर, उपनगर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण राहिले. मात्र, रात्री साडेनऊ वाजल्यापासून पुन्हा पावसाने जोरदार ...

Sun all day and heavy rain at night in Kolhapur | कोल्हापुरात दिवसभर ऊन अन् रात्री जोरदार पाऊस

कोल्हापुरात दिवसभर ऊन अन् रात्री जोरदार पाऊस

कोल्हापूर : शहर, उपनगर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर ऊन, ढगाळ वातावरण राहिले. मात्र, रात्री साडेनऊ वाजल्यापासून पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली. रात्री उशिरापर्यंत कोसळत राहिलेल्या या पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत राहिले.

गेल्या आठ दिवस ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी वळवाप्रमाणे पाऊसही पडत आहे. गुरुवारी सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी होती. दुपारी काही वेळ कडकडीत ऊन होते. त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण राहिले.

पावसाने उघडीप दिली असे वाटत असताना रात्री साडेनऊ वाजल्यापासून शहर परिसरात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री बराच वेळ कोसळत होता. ज्यांनी रेनकोट आणले नव्हते त्यांना भिजत घरी परतावे लागले. या पावसामुळे रस्त्यावरुन पाण्याचे पाट वाहायला लागले, गटारी भरून वाहत राहिल्या.

Web Title: Sun all day and heavy rain at night in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.