बायकोच्या साडीनेच गळफास घेउन रिक्षाचालकाने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 11:49 IST2017-11-30T11:42:35+5:302017-11-30T11:49:52+5:30
सडोली खालसा (ता. करवीर) येथील रिक्षाचालक मधुकर रामचंद्र आवळे (वय ४५) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांवर बुधवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित पत्नी प्रतीक्षा मधुकर आवळे, सासू छाया सुनील कांबळे (दोघी रा. दुधगाव, ता. मिरज), आजेसासू कमल राजाराम आवळे (रा. कवठेपिरान, ता. मिरज), बंडा गणपती काळे (रा. वसंतनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.

बायकोच्या साडीनेच गळफास घेउन रिक्षाचालकाने केली आत्महत्या
कोल्हापूर : सडोली खालसा (ता. करवीर) येथील रिक्षाचालक मधुकर रामचंद्र आवळे (वय ४५) यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांवर बुधवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. संशयित पत्नी प्रतीक्षा मधुकर आवळे, सासू छाया सुनील कांबळे (दोघी रा. दुधगाव, ता. मिरज), आजेसासू कमल राजाराम आवळे (रा. कवठेपिरान, ता. मिरज), बंडा गणपती काळे (रा. वसंतनगर, सांगली) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, मधुकर आवळे यांचा पत्नी प्रतीक्षा हिच्यासोबत कौटुंबिक वाद होता. त्यातून ती माहेरी राहण्यास गेली होती. या वादातून मधुकर यांनी राहत्या घरी तुळईस बायकोच्या साडीनेच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या शर्टच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडली.
त्यामध्ये मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारी माझी पत्नी प्रतीक्षा आवळे, सासू छाया कांबळे, आजेसासू कमल आवळे, बंडा काळे यांनी मला भरपूर त्रास दिला आहे. त्यांच्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. ही चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली. मधुकर यांचे भाऊ अरुण रामचंद्र आवळे यांनी या प्रकरणी संशयितांविरोधात करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.