वयोमानाने जगणे असह्य, दिव्यांग मुलासह वडिलांची आत्महत्या; कोल्हापुरातील खळबळजनक घटना
By विश्वास पाटील | Updated: September 16, 2023 13:21 IST2023-09-16T13:07:54+5:302023-09-16T13:21:48+5:30
कोल्हापूर : दिव्यांग मुलाला विष पाजून वयोमानाने आता जगणे असह्य झाल्याने वडिलांनाही विष पिऊन आपले जीवन संपवले. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत ...

वयोमानाने जगणे असह्य, दिव्यांग मुलासह वडिलांची आत्महत्या; कोल्हापुरातील खळबळजनक घटना
कोल्हापूर: दिव्यांग मुलाला विष पाजून वयोमानाने आता जगणे असह्य झाल्याने वडिलांनाही विष पिऊन आपले जीवन संपवले. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील चंद्रेश्वर गल्लीत ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
जाधव हे पिगमी गोळा करण्याचे काम करीत होते. यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांनी आपल्या मतिमंद मुलाचा सांभाळ केला होता. सगळीकडे घेऊन ते त्याला जात होते. पण वयोमानाने आता त्यांना जगणे असह्य होऊ लागले होते.
अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विष देऊन प्रथम मुलाला संपवले अन् नंतर स्वत:चे जीवन संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.