पन्हाळ्यावर प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 10:44 IST2021-02-26T10:41:30+5:302021-02-26T10:44:37+5:30

Crime News Police Kolhapur- पन्हाळा गडाच्या पश्चिमेस घटशीळ या आडमार्गावर बुधवारी सायंकाळी एका प्रेमीयुगलाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या हाताची नस कापून घेतली. त्यांना अत्यावस्थेत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, यातील युवती ही अल्पवयीन आहे.

Suicide attempt of a couple in Ghatshil area of Panhala | पन्हाळ्यावर प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न

पन्हाळ्यावर प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्देघाटशीळ परिसरात प्रेमीयुगलाचा आत्महत्येचा प्रयत्न दोघेही अत्यावस्त : विषप्राशन करून हाताच्या नस घेतल्या कापून

कोल्हापूर : पन्हाळा गडाच्या पश्चिमेस घटशीळ या आडमार्गावर बुधवारी सायंकाळी एका प्रेमीयुगलाने आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. दोघांनीही विषारी द्रव्य प्राशन करून आपल्या हाताची नस कापून घेतली. त्यांना अत्यावस्थेत सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, यातील युवती ही अल्पवयीन आहे.

कोल्हापूर शहरातील १६ वर्षांची युवती आणि पन्हाळा तालुक्यातील २१ वर्षीय युवक या प्रेमीयुगलाने बुधवारी सायंकाळी पन्हाळा गाठले. त्यांनी गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या घाटशीळ या आडमार्गावर जाऊन तेथे दोघांनी प्रथम विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर त्यांनी आपल्या हाताची नस कापून घेतली. हा प्रकार परिसरातील नागरिक व नातेवाइकांच्या लक्षात आला,

त्यांना मध्यरात्रीच तातडीने अत्यावस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे प्रथमोपचार करून गुरुवारी पहाटे दोघांनाही खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. दोघांचीही प्रकृती अत्यावस्त असून, त्यांनी आत्महत्येचे हे टोकाचे पाऊल का उचलले? याचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Suicide attempt of a couple in Ghatshil area of Panhala