गडहिंग्लज, मुरगुड रुग्णालयाचा प्रस्ताव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:20+5:302021-05-26T04:26:20+5:30

कोल्हापूर : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० तर मुरगुड ग्रामीण रुग्णालय ५० बेडेड करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून पाठवावा, असे ...

Suggest Gadhinglaj, Murgud Hospital | गडहिंग्लज, मुरगुड रुग्णालयाचा प्रस्ताव द्या

गडहिंग्लज, मुरगुड रुग्णालयाचा प्रस्ताव द्या

Next

कोल्हापूर : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात २०० तर मुरगुड ग्रामीण रुग्णालय ५० बेडेड करण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करून पाठवावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक झाली.

शहर आणि जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात येत आहेत. परिणामी सीपीआरवर अतिरिक्त ताण पडत आहे. तो कमी करण्यासाठी गडहिंग्लज येथील १०० बेडच्या रुग्णालयाची क्षमता वाढवून २०० बेड करणे २० बेडच्या मुरगुड ग्रामीण रुग्णालयात ५० बेडची क्षमता करण्यासाठी मंंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला आहे. दोन्ही रुग्णालयातील बेडची क्षमता का वाढवणे गरजेचे आहे, हे मुश्रीफांनी बैठकीत स्पष्ट केले. त्यानंतर तातडीने उपमुख्यमंत्री पवार यांनी बेडची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक प्रस्ताव गतीने तयार करून पाठवावा, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीस वित्त विभागाचे सचिव राजगोपाल देवरा, आरोग्य विभागाचे सचिव रामा स्वामी, नियोजन विभागाचे अतिरिक्त सचिव देवासी चक्रवर्ती आदी उपस्थित होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी आणि येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑनलाईन हजेरी लावली.

Web Title: Suggest Gadhinglaj, Murgud Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.