शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

उसाचा हंगाम अन् अपघातांना निमंत्रण नित्याचेच..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:53 IST

शिवानंद पाटील गडहिंग्लज : ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि ...

शिवानंद पाटील

गडहिंग्लज : ऊस हंगाम सुरू झाला की मुख्य प्रश्न निर्माण होतो तो वाहतुकीची कोंडी आणि अपघात रोखणे. ऊस हंगामाच्या सुरुवातीपासून अनेक अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्याचा प्रत्यय गडहिंग्लज तालुकावासीयांना येत असून गेल्या पंधरा दिवसांत तिघाजणांना आपण जीव गमवावा लागला आहे. अडकूर (ता. चंदगड) येथील कादर आदम कोवाडकर (वय ४५, रा. अडकूर, ता. चंदगड) हे दुचाकीने गडहिंग्लजहून घरी परतत होते. हरळीनजीक ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक करताना ट्रॉलीचा अ‍ॅक्सेल तुटल्याने डब्यातील संपूर्ण ऊसच त्यांच्यावर कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवारी (दि.१) नूल (ता. गडहिंग्लज) येथे भल्या पहाटे जनावरांना सायकलीवरून वाडे आणण्यासाठी जाणाऱ्या शाहरूख सनदी (२४) या तरुणाचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत प्राण गमवावा लागला.

बुधवारी (दि.२) गडहिंग्लज-उत्तूर मार्गावर उत्तूरचे कापड व्यापारी दत्तात्रय पाटील यांच्या दुचाकीने ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडक दिल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला.

ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली सुस्थितीत नसणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणे, वाहनांमध्ये मोठ्याने टेप लावणे, वाहनांच्या पाठीमागील बाजूस रिपलेक्टर न लावणे, रिकामे ट्रॅक्टर व ट्रक वेगाने पळविणे आदी कारणांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे वाहतूक प्रशासनानेही वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

* वाहतुकीची कोंडी

आजरा, चंदगड, संकेश्वर, गारगोटी, निपाणीकडे जाण्यासाठी शहरातील गडहिंग्लज-संकेश्वर-आजरा या एकाच मुख्य रस्त्यावरून वाहतूक होते. याच मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालये, वाचनालय, बाजारपेठ, नगरपालिका, पोलिस ठाणे असल्याने याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यातच ऊसाची वाहतूकही या मार्गावरून होत असल्याने या मार्गावर जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागतात.

* रिंगरोड हाच उपाय

शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शहरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी पर्यायी मार्गाची सोय होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील प्रलंबित रिंगरोडचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.