शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सीमाभागात उसाची पळवापळवी, महाराष्ट्रातील कारखानदार निवडणुकीच्या रणांगणात मग्न

By भीमगोंड देसाई | Updated: November 14, 2024 15:18 IST

भीमगोंडा देसाई  कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार फडात जिल्ह्यातील कारखानदार असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंदच आहेत. ऊसतोडीचा हंगाम ...

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार फडात जिल्ह्यातील कारखानदार असल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांची धुराडी बंदच आहेत. ऊसतोडीचा हंगाम लांबला आहे. याचा फायदा घेत सीमा भागातील बेळगाव जिल्ह्यातील आठ साखर कारखाने सुरू झाले आहेत. यांच्याकडून जिल्ह्यातील ऊसतोडी सुरू केल्या आहेत. ते उसाची पळवापळवी करीत आहेत. गेल्या हंगामापर्यंत कारखानदार शेतकरी संघटना आंदोलन करून कारखाने वेळेत सुरू करू देत नाहीत, असा आरोप करीत होते. यंदा शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसलेले नाही. तरीही कारखानदार हंगामाला सुरुवात केलेली नाही. ऊसतोडी करण्यापेक्षा राजकीय फडातच ते व्यस्त आहेत.कोल्हापूर आणि बेळगाव जिल्ह्यातील सीमेलगतच्या साखर कारखान्यांची नोंदणी बहुराज्य असल्याने ते महाराष्ट्र, कर्नाटकातील ऊस गाळप करतात. कोल्हापूर जिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत. यातील चंदगड, गडहिंग्लज, कागल, इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ आदी परिसरातील साखर कारखाने दरवर्षी बेळगाव जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात गाळप करतात. पण यंदा विधानसभेच्या निवडणूक रिंगणात पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असल्याने अजून गाळप हंगाम सुरू केलेला नाही.याउलट बेळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र सीमेजवळील संकेश्वर, निपाणी, बेडकीहाळ, चिक्कोडी, शिवशक्ती, अरिहंत-चिक्कोडी, उगार शुगर्स, अथणी शुगर्स, कृष्णा- अथणी हे साखर कारखाने ९ नाेव्हेंबरला सुरू झाले आहेत. या कारखान्यांच्या ऊसतोडीच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात या कारखान्यांची ऊसतोड सुरू झाली आहे. यामुळे यंदा ऊसतोडीत बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.

यंदाही ऊस पिकासाठी सुरुवातीपासून वातावरण प्रतिकूल राहिले. परिणामी उसाची अपेक्षित अशी वाढ झालेली नाही. यामुळे उसाच्या उत्पादनातही घट येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या एप्रिल, मे महिन्यात उन्हाळा तीव्र असल्याने सीमा भागातील ऊस वाळला. वाळलेला ऊस संबंधित शेतकऱ्यांनी जनावरांना कापून घातला. उसाचे क्षेत्र घटले. म्हणून सीमा भागातील कारखाने आपला गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाधिक ऊस नेण्याचे नियोजन केल्याचे सध्या आलेल्या ऊस तोडणी मजुरांच्या टाेळ्यांवरून दिसत आहे.मध्यप्रदेश, बिहारहून मजूरमहाराष्ट्र आणि कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, मंड्या या भागात प्रत्येक वर्षी ऊसतोडणी मजूर विदर्भ, मराठवाडा भागातून जातात. पण येथील ऊसतोडणी मजुरांनाही प्रचाराचे स्थानिक पातळीवरच काम मिळाले आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील कारखानदारांनी यंदा मध्यप्रदेश, बिहार येथून ऊसतोडणी मजूर आणले आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक 2024Karnatakकर्नाटकkolhapurकोल्हापूर