शिरसंगीत ५० एक्करमधील उसाच्या फडाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:32 IST2021-02-10T16:30:11+5:302021-02-10T16:32:04+5:30
Fire Ajra Kolhapur- आजरा तालुक्यातील शिरसंगी येथे शॉर्टसर्किटने उसाच्या फडाला लागलेल्या आगीत ५० एक्करमधील उस जळाला. आगीत ३५ ते ४० शेतकऱ्यांचे उसाबरोबर पाइपलाइन, शेती अवजारेही जळाली.

शिरसंगीत ५० एक्करमधील उसाच्या फडाला आग
ठळक मुद्देशिरसंगीत ५० एक्करमधील उसाच्या फडाला आग३५ शेतकऱ्यांचे २० लाखांवर नुकसान, आजरा तालुक्यातील घटना
सदाशिव मोरे
आजरा -आजरा तालुक्यातील शिरसंगी येथे शॉर्टसर्किटने उसाच्या फडाला लागलेल्या आगीत ५० एक्करमधील उस जळाला. आगीत ३५ ते ४० शेतकऱ्यांचे उसाबरोबर पाइपलाइन, शेती अवजारेही जळाली.
आगीत अंदाजे २० लाखांवर नुकसान झाले आहे. ही घटना म्हारकी नावाच्या शेतात दुपारी १२ वा. सुमारास घडली. शिरसंगी ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले होते.तब्बल तीन तास आग विझविण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीचे लोळ २५ ते ३० फूट उंचीचे होते.