शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

सुधीर फडके यांनी गायनातून निष्ठा शिकविली : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 2:34 PM

संगीतकार, कवी, गायक कै. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या गायकीतून समाजाला संदेश देतानाच निष्ठा ठेवण्याचे शिकविले. त्यांची सावरकरांवर नितांत श्रद्धा होती.

ठळक मुद्देराज्यस्तरीय गायन स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण-सुधीर फडके जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य देवल क्लबतर्फे फडके यांनीच गायलेल्या गीतांवर आधारित राज्यस्तरीय गायन स्पर्धा

कोल्हापूर : संगीतकार, कवी, गायक कै. बाबूजी अर्थात सुधीर फडके यांनी आपल्या गायकीतून समाजाला संदेश देतानाच निष्ठा ठेवण्याचे शिकविले. त्यांची सावरकरांवर नितांत श्रद्धा होती. बाबूजींचा मलाही सहवास लाभला, अशा शब्दांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी फडके यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुधीर फडके जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून देवल क्लबतर्फे फडके यांनीच गायलेल्या गीतांवर आधारित राज्यस्तरीय गायन स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्यांना रविवारी संध्याकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी गायक श्रीधर फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाबूंच्या गीतांचे सादरीकरण केले. याला रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्यांना शिल्पा पुणतांबेकर, सचिन जगताप, वैभव फणसळकर, सुनील गुरव, भाग्यश्री मुळे यांनी उत्तम साथ दिली. बाबूजींच्या अवीट गोडीच्या गीतरचना ऐकण्यासाठी नाट्यगृह तुडुंब भरले होते.

या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ९२ गायकांनी यात सहभाग घेतला. यात छोटा व मोठा अशा दोन गटांतील प्रत्येकी तीन यांना अनुक्रमे २१ हजार, १५ हजार व १० हजार अशी रोख बक्षिसे देण्यात आली. छोट्या गटातील तिघांना उत्तेजनार्थ म्हणून प्रत्येक पाच हजार रुपये बक्षीस देण्यात आले. याशिवाय चार स्पर्धकांचा विशेष बक्षिसाने गौरव करण्यात आला. यावेळी श्रीकांत डिग्रजकर यांची उपस्थिती होती.-प्रथक क्रमांकाच्या विजेत्यांना अंदमान सफरया स्पर्धेत प्रथम आलेल्या छोट्या गटातून प्रथम आलेला सिद्धराज पाटील व मोठ्या गटातून प्रथम आलेल्या अमयकुमार पोतदार यांना अंदमान येथील सावरकरांचे स्मारक पाहण्यासाठी तिकीट देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.गायन स्पर्धेतील विजेतेछोटा गट (१५ ते ३० वयोगट)प्रथम : सिद्धराज पाटील (कसबा बीड, करवीर), द्वितीय मोनिका साठे (शिंपे, ता. शाहूवाडी), तृतीय : मृण्मयी जोशी (पुणे). उत्तेजनार्थ : मुश्तकीन मोमीन (कोल्हापूर), अनुष्का आपटे (बेळगाव), सिद्धी वेताळ (मुंबई).मोठा गट (३१ ते ४५) प्रथम : अमयकुमार पोतदार (कोल्हापूर), द्वितीय : श्रेया देशपांडे (नवी मुंबई), तृतीय : समीर वायंगणकर (गोवा) स्वर्गीय सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापुरातील देवल क्लबतर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेतील विजेत्यांना रविवारी केशवराव भोसले नाट्यगृहात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी गायक श्रीधर फडके, श्रीकांत डिग्रजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर