दैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 04:55 PM2020-01-27T16:55:41+5:302020-01-27T16:58:14+5:30

कोल्हापूर येथील दैवज्ञ बोर्डिंगच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. विरोधी दैवज्ञ तिरूपती बालाजी पॅनेलने आठ जागा जिंकत जबरदस्त लढत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढचे सुधाकर पेडणेकर यांनी विरोधी दिलीप ऊर्फ चंद्रकांत चोडणकर यांचा १८ मतांनी पराभव केला. सकाळी नऊपासूनच मतदानाला प्रारंभ झाला.

Sudhakar Pednekar, President of 'ruling' in Divine Boarding | दैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकर

कोल्हापुरात दैवज्ञ बोर्डिंगच्या निवडणुकीचा निकाल  जाहीर करण्यात आला. निकाल ऐकण्यासाठी सभासद, कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. (छाया- आदित्य वेल्हाळ)

googlenewsNext
ठळक मुद्देदैवज्ञ बोर्डिंगमध्ये ‘सत्तारूढ‘ची बाजी, अध्यक्षपदी सुधाकर पेडणेकरविरोधकांचीही अटीतटीची लढत

कोल्हापूर : येथील दैवज्ञ बोर्डिंगच्या द्विवार्षिक निवडणुकीमध्ये सत्तारूढ दैवज्ञ विश्वकर्मा सत्तारूढ पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकून बाजी मारली आहे. विरोधी दैवज्ञ तिरूपती बालाजी पॅनेलने आठ जागा जिंकत जबरदस्त लढत दिली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये सत्तारूढचे सुधाकर पेडणेकर यांनी विरोधी दिलीप ऊर्फ चंद्रकांत चोडणकर यांचा १८ मतांनी पराभव केला.
सकाळी नऊपासूनच मतदानाला प्रारंभ झाला.

१८०० पैकी १११८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बोर्डिंगच्या दोन्ही बाजूंना दोन्ही पॅनेलचे उमेदवार उभे राहून मतदारांना आवाहन करीत होते. दुपारी चारपर्यंत ५७ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.

पदाधिकाऱ्यांच्या सहा पदांपैकी चार जागा सत्तारूढ पॅनेलने जिंकल्या; तर दोन जागांवर विरोधकांचे उमेदवार विजयी झाले. खालील १३ जागांपैकी सत्तारूढच्या सात, तर विरोधकांच्या सहा जागांवर उमेदवार विजयी झाले. हा निकाल जाहीर झाला. मात्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सुपरिटेंडेंट या पदांसाठी फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली.

 निवडणूक निर्णय अधिकारी असीफ शेख यांनी रात्री नऊ वाजता निकाल जाहीर केला. निकालानंतर सत्तारूढच्या समर्थकांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विजयी उमेदवार खालीलप्रमाणे, कंसात मते

अध्यक्ष- सुधाकर पेडणेकर (सत्तारूढ, ५५४),उपाध्यक्ष- मधुकर पेडणेकर (विरोधी ५४८), सेक्रेटरी विजय घारे (सत्तारूढ ५६१), उपसेक्रेटरी-श्रीकांत कारेकर (सत्तारूढ ५६८), खजानिस- श्रीराम भुर्के (विरोधी ५५४), सुपरिंटेंडेंट -प्रभाकर अणवेकर (सत्तारूढ ५४४, केवळ एक मताने विजयी)

विजयी समिती सदस्य

  • सत्तारूढ

पद्माकर नार्वेकर (५५७), गजानन नागवेकर (५५४), प्रवीण मालवणकर (५४६), संजय कारेकर (५३३), शेखर पाटगावकर (५१६), गजानन भुर्के (५१०), रत्नाकर नागवेकर (५०६).

  • विरोधी

मुरलीधर मसूरकर (५८८), एकनाथ चोडणकर (५६८), सुनील बेळेकर (५४०), महेश पोतदार (५३६), किशोर कारेकर (५१४), महेश जामसांडेकर (५०४).

विरोधी मसूरकरांना सर्वाधिक मते

समिती सदस्यांमधून निवडून आलेले विरोधी आघाडीचे मुरलीधर मसूरकर यांना सर्वाधिक म्हणजे ५८८ मते मिळाली. या निवडणुकीत मते मोठ्या प्रमाणावर बाद झाल्याचे दिसून आले.


सभासदांनी ज्या विश्वासाने आम्हांला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही यापुढील काळात दैवज्ञ बोर्डिंगचा कारभार करू.
सुधाकर पेडणेकर
नूतन अध्यक्ष, दैवज्ञ बोर्डिंग

 

 

Web Title: Sudhakar Pednekar, President of 'ruling' in Divine Boarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.