शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: एएस ट्रेडर्सच्या फरार संचालिका सुधा खडके गोव्यातून अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 12:16 IST

पोलिस कोठडीत रवानगी : आजवर १७ जणांना अटक

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्स कंपनीची संचालिका सुधा सुधाकर खडके (वय ६२, रा. गुणे गल्ली, गडहिंग्लज) हिला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील तळेगाव दुर्गावाडी येथून शनिवारी (दि. २२) अटक केली. न्यायालयात हजर केले असता तिची गुरुवारपर्यंत (दि. २७) पोलिस कोठडीत रवानगी झाली. गुन्हा दाखल झाल्यापासून २ वर्षे ३ महिने आणि २६ दिवस ती फरार होती.तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन वर्षांत एएस ट्रेडर्सच्या १७ संशयितांना अटक केली आहे. यातील १२ जणांची सुमारे १३ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, त्याची लिलाव प्रक्रिया करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या गुन्ह्यातील संशयित सुधा खडके ही एएस ट्रेडर्सची संचालिका गुन्हा दाखल झाल्यापासून पसार होती.ती गोव्यात राहत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तळेगाव दुर्गावाडी येथून तिला अटक केले. गुन्ह्यातील तिचा सहभाग तपासून तिच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार राजू येडगे, विजय काळे, प्रवीणा पाटील, राजेंद्र वरंडेकर यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.सुभेदारची नागपूर पोलिसांकडून चौकशीएएस ट्रेडर्स कंपनीवर नागपुरातही गुन्हा दाखल आहे. नागपूर पोलिसांनी दोन आठवड्यांपूर्वी या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याचा कळंबा कारागृहातून ताबा घेतला होता. चौकशीनंतर त्याला पुन्हा कळंबा कारागृहात सोडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसgoaगोवा