ताम्रपर्णीत पडलेल्या हॉटेल कामगाराला वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:56 IST2020-08-10T14:31:13+5:302020-08-10T14:56:04+5:30
कोवाड ( ता.चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीच्या महापूराच्या पाण्यात पडलेल्या हॉटेल कामगारला वाचविण्यात यश आले.

ताम्रपर्णीत पडलेल्या हॉटेल कामगाराला वाचविण्यात यश
राम व्हन्याळकर
कोवाड : कोवाड ( ता.चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीच्या महापूराच्या पाण्यात पडलेल्या हॉटेल कामगारला वाचविण्यात यश आले.
कोवाड - निट्टूर रोडवर ताम्रपर्णी नदीच्या काठावर 'गारवा हॉटेल' नामक हॉटेल आहे.त्याठिकाणी साफसफाई करणारा कामगार लघुशंकेसाठी हॉटेलच्या पाठीमागील बाजूस गेला होता.त्यावेळी पाय घसरून तो महापूराच्या पाण्यात पडला.
दरम्यान, त्याने पाण्यात बुडालेल्या एका पत्र्याच्या शेडचा आधार घेऊन आरडाओरडा केला. त्यामुळे कोवाडचे माजी उपसरपंच श्रीकांत पाटील यांनी प्रसंगावधान राखून त्याला आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढले.त्यामुळे त्याला जीवदान मिळाले.