दूध पावडरसाठी अनुदान देणार : सुनील केदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:01 IST2021-06-04T18:00:23+5:302021-06-04T18:01:15+5:30

Gokul Milk Kolhapur : राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने त्याचा फटका दूध संघांना बसत आहे. शिल्लक पावडरसाठी अनुदान देण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहीती राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

Subsidy for milk powder: Sunil Kedar | दूध पावडरसाठी अनुदान देणार : सुनील केदार

राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता गोकूळच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सचिन पाटील, एस. एम. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, प्रकाश पाटील, सचिन पाटील, ए. वाय. चौधरी उपस्थित होते. 

ठळक मुद्देदूध पावडरसाठी अनुदान देणार : सुनील केदार

कोल्हापूर : राज्यात रोज सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत असल्याने त्याचा फटका दूध संघांना बसत आहे. शिल्लक पावडरसाठी अनुदान देण्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहीती राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.

मंत्री केदार हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी गोकूळच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शिल्लक दुधाचा आढावा घेतला जात असून त्यानंतर पावडर अनुदानाबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंत्री केदार यांनी सांगितले.

गोकूळचे संचालक प्रकाश पाटील व रयत संघाचे संचालक सचिव विश्वास पाटील यांनी मंत्री सुनील केदार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दूध व्यवसायासमोरील अडचणी व संघाच्या प्रलंबीत प्रस्तावांना मंजुरी द्यावी, या मागणीचे निवेदनही गोकूळच्या वतीने मंत्री केदार यांना देण्यात आले. गोकूळचे डेअरी व्यवस्थापक ए. वाय. चौधरी, संघाचे बोर्ड सचिव एस. एम. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.
 

Web Title: Subsidy for milk powder: Sunil Kedar