पाठ्यपुस्तकांशिवाय अभ्यास, आॅनलाईन शिक्षण-भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:33 PM2019-01-02T23:33:59+5:302019-01-02T23:35:16+5:30

शिवाजी सावंत । गारगोटी : ‘शैक्षणिक पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात शिक्षण देणाºया ...

Studies without textbooks, online teaching- Bhatargad's headpiece | पाठ्यपुस्तकांशिवाय अभ्यास, आॅनलाईन शिक्षण-भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

पाठ्यपुस्तकांशिवाय अभ्यास, आॅनलाईन शिक्षण-भुदरगडच्या शिरपेचात मानाचा तुरा

Next
ठळक मुद्देखानापूर प्राथमिक शाळेचा आंतरराष्ट्रीय शिक्षण दर्जासाठी निवड

शिवाजी सावंत ।
गारगोटी : ‘शैक्षणिक पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात शिक्षण देणाºया शाळेत निवड झाल्याने भुदरगड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.

अभ्यासक्रमांवर आधारित पण पुस्तके नाहीत, अभ्यास आणि परीक्षा यांची काठीण्य पातळीत वाढ, पाठ्यपुस्तकांशिवाय अभ्यास, सर्व शिक्षण आॅनलाईन पद्धतीने हे सांगण्यात आल्यावर पालक आणि लोकप्रतिनिधी गोंधळले; परंतु या गावातील लोकांनी धाडसाने या प्रयोगाला संमती दिली. त्यामुळे या शाळेची निवड ‘एमआयबी’त होण्यास मदत झाली. अशा तीन टप्प्यांत जाईपर्यंत काही शाळांनी माघार घेतली तर या शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा भोपळे या आग्रही राहिल्या. त्यांनी तिन्ही टप्पे शिक्षक, पालकांच्या पाठबळावर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पार केले आहेत.

सध्या त्या सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या चिदंबर चित्रगार यांची नियुक्ती झालेली आहे. नियुक्ती झालेल्या शिक्षकांना या मंडळातर्फे ठाणे जिल्ह्यात ३२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण दिले. सध्या या शाळेत १0५० पुस्तके आणि १५० ई-बुक असे सुसज्ज ग्रंथालय आहे.

या प्रशालेत जून २0१८ पासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमात शिक्षण सुरू झाले आहे. मुख्याध्यापकांच्यासह आठ शिक्षक सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मुलांना अध्यापन करत आहेत. दोन सत्रांत शाळा भरविली जात आहे. पहिली ते तिसरी इयत्तेपर्यंत १६४ विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात आला आहे. तर पूर्व प्राथमिकमध्ये १४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. नैसर्गिकरीत्या वाढीने बारावीपर्यंत हे शिक्षण दिले जाणार आहे. एमआयबीकडून सध्या प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये राज्यातील ४८८८ शाळांनी आपले प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामधून केवळ ७८ शाळांची निवड करण्यात येणार आहे.

मुख्याध्यापक चिदंबर चित्रगार म्हणाले, मातृभाषेतील शिक्षणातूनच विद्यार्थी मोठा होऊ शकतो. शिवाय या प्रणालीत पाठ्यपुस्तकांशिवाय शिक्षण ही या विभागाला मिळालेली मोठी देणगी आहे. या संकल्पनेत शिकणारा विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही अडखळणार नाही. इतक्या शास्रशुद्ध पद्धतीने या प्रणालीची निर्मिती करण्यात आली आहे. भविष्यात या शाळेमध्ये वेब लनिंंग, जागतिक भाषा, प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, कला विभाग, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ, माँटेसरी प्रयोगशाळा, सेंद्रीय उत्पादनासाठी प्रचार आणि प्रसार, असे नवनवीन अभिनव कल्पनेतील उपक्रम राबविण्यात आमची शाळा प्रयत्नशील राहणार आहे.

Web Title: Studies without textbooks, online teaching- Bhatargad's headpiece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.