शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम, ७५० पोती प्लास्टिक केले गोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 16:23 IST

मंत्री भरत गोगावले यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने १५० स्वयंसेवकांच्या साथीने रायगडावर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत ७५० गोणी प्लास्टिक व अन्य कचरा संकलन करण्यात आले. मंत्री भरत गोगावले यांच्यासह माजी खासदार संभाजीराजे यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्याचे कौतुक केले.विद्यापीठाच्या वतीने ४ जून ते ८ जून या कालावधीत १५० स्वयंसेवकांसह रायगड परिक्रमेसह किल्ले रायगडाची स्वच्छता मोहीम पार पाडली. या मोहिमेमध्ये पहिल्या दिवशी इतिहास अभ्यासक प्रा. भिकाजी लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य याविषयी माहिती दिली. इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या यशस्वी मोहिमांबद्दल माहिती दिली.शिवराज्याभिषेक दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण रायगडाची स्वच्छता केली. ७ जून २०२५ रोजी पुन्हा रायगडावर निर्माण झालेला कचरा तसेच प्लास्टिक संकलित करून ते पुनर्प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या स्वच्छता मोहिमेंतर्गत रायगड किल्ल्यावरील होळीचा माळ ते जगदीशश्वर मंदिर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज यांचे समाधीस्थळ परिसर, राजसदर परिसर, बाजारपेठ परिसर तसेच रोपवेपर्यंतच्या रस्त्यावरील साफसफाई आणि महा दरवाजा ते चित्त दरवाजा या गडउतार होण्याच्या पायी मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवली. यामध्ये सुमारे ३०० बॅग प्लास्टिक स्वयंसेवकांनी संकलित केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. तानाजी चौगले यांच्या नेतृत्वाखाली एनएसएसचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. आर. माळी, डॉ. गोरखनाथ किर्दत, डॉ. सचिन चव्हाण यांनी शिबिराचे संयोजन केले. मोहिमेसाठी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.