कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 13:12 IST2018-08-03T13:08:09+5:302018-08-03T13:12:39+5:30

खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले.

Students of Kolhapur met Prime Minister Narendra Modi | कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

कोल्हापुरातून दिल्लीला नेण्यात आलेल्या शालेय मुलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

ठळक मुद्देकोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी घेतली पंतप्रधानांची भेटधनंजय महाडिक यांचा उपक्रम: पंतप्रधानांनी मराठीतून साधला संवाद

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी इथून दिल्लीला नेलेल्या शालेय मुलांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या विद्यार्थ्यांशी आपुलकीने मराठी भाषेतून संवाद साधल्याने सर्वच विद्यार्थी भारावले.

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३० शालेय मुला-मुलींनी बुधवारी विमानातून थेट दिल्ली गाठली. या मुलांनी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या या मुलांशी मराठीमधून संवाद साधत, त्यांची आस्थेने आणि आपुलकीने विचारपूस केली.

शिवाय नव्या पिढीच्या मनातील कल्पना, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी, अभिनव संकल्पनेतून कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील निवडक मुलांना दिल्लीला नेऊन संसदेचे कामकाज, राष्ट्रपती भवन तर दाखवलेच; पण पंतप्रधानांची भेट घालून दिल्याने, या मुलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पंतप्रधान मोदी यांनी, खासदार महाडिक यांच्या संकल्पनेचेही भरभरून कौतुक केले.

 

 

Web Title: Students of Kolhapur met Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.