कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची तीव्र निदर्शने

By विश्वास पाटील | Updated: July 11, 2023 16:36 IST2023-07-11T16:35:31+5:302023-07-11T16:36:03+5:30

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल भाजपाच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने ...

Strong protests by Congress against BJP in Kolhapur | कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची तीव्र निदर्शने

कोल्हापुरात भाजप विरोधात काँग्रेसची तीव्र निदर्शने

कोल्हापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना खोट्या मानहानी खटल्यात अडकविल्याबद्दल भाजपाच्या विरोधात कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

यावेळी “मोदी सरकार चले जाव, भाजप सरकार मुर्दाबाद, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो, मोदी -शहा चले जाव" अशा घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील परिसर दणाणून सोडला. आमदार पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, जयंत आसगावकर, शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी हे आंदोलन करण्यात आले. 

यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी तीव्र भावना व्यक्त केल्या. मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे बाजीराव खाडे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, अंजना रेडेकर, महिला आघाडीच्या सरलाताई पाटील, सुप्रिया साळोखे, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुदिहाळकर, शशांक बावचकर यांच्यासह माजी नगरसेवक, ब्लॉक अध्यक्ष, सेवादल, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एन एस यु आय व सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Strong protests by Congress against BJP in Kolhapur