शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मतभेदाला पूर्णविराम; हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करूनच रणनीती - आमदार प्रकाश आवाडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 14:16 IST

बावनकुळे यांनी दिली आवाडे यांच्या निवासस्थानी भेट

इचलकरंजी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शहरातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली असून, आता मतभेदाला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे यापुढे सुरेश हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करूनच सर्व रणनीती आखली जाईल, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी सांगितले.आवाडे यांच्या भाजप प्रवेशानंतर शहरातील दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांत खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढून आवाडे-हाळवणकर यांच्या मनोमिलनासाठी आलेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राहुल आवाडे, मोसमी आवाडे, स्वप्नील आवाडे यांच्यासह आवाडे कुटुंबीयांसोबत त्यांनी संवाद साधला.त्याबद्दल माहिती सांगताना आमदार आवाडे म्हणाले, पक्षासोबत आगामी सर्व निवडणुकांमध्ये जिल्ह्यात भाजपची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लवकरच हाळवणकर यांच्यासोबत चर्चा करून पक्षाचे पुढील निर्णय ठरवले जातील. कार्यालयात प्रवेश करण्यासह निवडणुकीची रूपरेषाही ठरवली जाईल.राहुल आवाडे म्हणाले, भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत आम्ही आणि आमचे कार्यकर्ते यांचे नक्कीच मनोमिलन होईल. त्याचबरोबर फक्त विधानसभेसाठीच नाही, तर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आम्ही एकत्र ताकद लावून सर्व ठिकाणी भाजपचा विजय होण्यासाठी नियोजन करणार आहे.आवाडे यांना निमंत्रण नाहीभाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांची समजूत काढण्यासाठी आयोजित केलेला मेळावा असल्याने आवाडे यांना मेळाव्यास निमंत्रण नव्हते. त्यामुळे मेळावा संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आवाडे यांची बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांना पक्षशिस्तीसंदर्भात सूचना देऊन एकत्रित काम सुरू करण्यासंदर्भात सांगितल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीvidhan sabhaविधानसभाPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरBJPभाजपा