शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

कुरुंदवाड पालिकेत रिक्त जागांमुळे ताण

By admin | Updated: September 9, 2016 01:11 IST

२४ पैकी २१ जागा रिक्त : तीन अधिकारी, एका लिपिकावर कामकाज

गणपती कोळी - कुरूंदवाड -येथील पालिकेतील राज्य संवर्गातील १४ पैकी ११ जागा, लिपिक संवर्गातील १० पैकी ९ जागा रिक्त आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची वानवा असून, पालिका प्रशासनाचा संपूर्ण कामाचा ताण मुख्याधिकारी यांच्यावर पडत आहे. पदावर असलेल्या केवळ तीन अधिकाऱ्यांवरच पालिकेचा कारभार सुरू असून पालिकेची अवस्था कर्मचाऱ्याविना ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशीच झाली आहे. पालिका प्रशासनात प्रत्येक विभागात पदसंख्येनुसार अधिकारी, कर्मचारी असेल तर कोणत्याही कामाचा निपटारा होऊ शकतो. मात्र, आस्थापना खर्चावरून येथील पालिकेतील नोकरभरतीच नसल्याने व सेवानिवृत्त आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागी नवा अधिकारीही नसल्याने शहराच्या विकासाला बे्रक लागला आहे. त्यामुळे विविध योजना राबविणे, लोकप्रतिनिधींच्या सूचना, नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला अडचणी येत आहेत. पालिकेत राज्य संवर्गातील १४ पदसंख्या आहे. मात्र, प्रत्यक्षात सहायक विधी विभाग, संगणक अभियंता व स्वच्छता, पाणीपुरवठा या तीन विभागाव्यतिरिक्त इतर ११ विभागांतील पदे रिक्तआहेत. त्यामुळे सर्वांत महत्त्वाचे बांधकाम अभियंता, कर विभाग, लेखा विभाग, आस्थापना विभागात अधिकारीच नसल्याने कामे ठप्प झाली आहेत. लिपिक संवर्गातील मंजूर दहापैकी केवळ एकच लिपिक आहे. उर्वरित नऊ जागा रिक्त आहेत. पालिका प्रशासनाने पदोन्नतीचा प्रस्ताव पूर्वीच पाठविला असून, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडेच प्रलंबित राहिला आहे. उपलब्ध असलेले राज्य संवर्गातील तीन अधिकारी व एका लिपिकावर पालिकेचा कारभार करताना मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर याची दमछाक होत आहे. त्यामुळे कोणत्याही कामाचा वेळेत निपटारा होत नसल्याने पालिका प्रशासनाची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’अशी झाली आहे. लोकप्रतिनिधींना निवडणुकीचे डोहाळे लागल्याने याकडे लक्ष देण्यास त्यांच्याकडे वेळच नाही, तर नागरिकांच्या समस्यांना मुख्याधिकारी यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पालिकेच्या रिक्त पदाबाबत व पदोन्नतीच्या प्रस्तावाबाबत त्वरित निर्णय घेऊन पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. दैनंदिन कामाला खीळपालिकेत सध्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे वर्ष चालू आहे. शहरातील नवीन बांधकाम, नवी कर आकारणी करणे, बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी पालिकेकडे कर विभागाला अधिकारीच नसल्याने कर आकारणी माहिती खोळंबली आहे. तसेच अग्निशामक विभागातील तीन मंजूर असलेली फायरमन पदेही रिक्त आहेत. त्यामुळे या महत्त्वाच्या विभागालाही रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. या पदासाठी मुलाखती झाल्या असून, मात्र अद्याप भरती झाली नाही.