शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

वादळ शमले... आता कार्यकर्त्यांकडून शेट्टींची मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 11:08 AM

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानीमध्ये दोन दिवसांपासून उठलेले हे वादळ पेल्यातीलच होते, हे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देवादळ शमले... आता कार्यकर्त्यांकडून शेट्टींची मनधरणीस्वाभिमानीतील वाद : प्रदेशाध्यक्षांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी घेण्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिल्या फळीतील नेत्यांकडून बाहेर आलेली बंडाची तलवार शुक्रवारी पूर्णपणे म्यान झाली. प्रा. जालंधर पाटील व सावकर मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्वाभिमानीमध्ये दोन दिवसांपासून उठलेले हे वादळ पेल्यातीलच होते, हे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, शेट्टी यांनीच आमदार व्हावे, अशी राज्यभर मोहीम सुरू झाली असून कार्यकर्त्यांकडून शेट्टी यांच्या मनधरणीसाठी विविध मार्ग अवलंबले जात आहेत.शेट्टी यांचे सर्वाधिक विश्वासू आणि जवळचे सहकारी असलेले प्रा. पाटील व मादनाईक यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेण्यावरून नाराजी व्यक्त करताना आपला उमेदवारीसाठी का विचार झाला नाही, अशी खंत व्यक्त केली होती.यावरून शेतकरी संघटनेतील कलह राज्यभर पोहोचला होता. संघटना पुन्हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे, अशीही जोरदार चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाटील व मादनाईक यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेऊन शेट्टी यांचा मार्ग मोकळा करून दिला आहे; पण आता शेट्टी यांनीच उमेदवारी स्वीकारावी यासाठी कार्यकर्त्यांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर आज, शनिवारी शेतातच आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असल्याने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कार्यकर्त्यांची आज बैठक बोलावली आहे.आता लक्ष शेट्टींच्या भूमिकेकडेआपल्यालाच का उमेदवारी स्वीकारावी लागली याचा खुलासा फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून केल्यानंतर राजू शेट्टी यांनी आमदारकी नको अशी भूमिका घेत यावर प्रतिक्रिया देणे बंद केले आहे. उमेदवारीवरून संघटनेत वाद नकोत म्हणून पाटील व मादनाईक यांनी नमते घेतले तरी शेट्टी यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे ते काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.समाजमाध्यमांवर शेट्टींचेच वारेसंघटनेतूनच विरोध झाल्याने व्यथित झालेले शेट्टी यांनी ह्यआमदारकीची ब्याद नको,ह्ण असे जाहीर केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. समाजमाध्यमांवर शेट्टी समर्थकांचेच वारे वाहू लागले असून, आमदारकी स्वीकारा नाही तर पदांचे सामूहिक राजीनामे देऊ, घरासमोर येऊन उपोषणाला बसू असे आर्जवही केले जात आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शेट्टी सभागृहात हवेत, असे समर्थन करतानाच एक गट्टी - राजू शेट्टी असा नाराही पुन्हा एकदा घुमू लागला आहे. राज्यभरात कार्यकर्त्यांनी बैठकांचा धडाका लावला असून आमदारकी स्वीकारावी यासाठी जोरदार आग्रह धरला जात आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर