शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अंकलीजवळ रास्ता रोको

By admin | Updated: August 26, 2015 00:12 IST

पानसरेंच्या मारेकऱ्यांना अटक करा : ‘डीपीआय’चा मोर्चा काढण्याचा इशारा

जयसिंगपूर : डॉ. नरेंद्र दाभोळकर व गोंविद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अद्याप अटक करण्यात शासन अपयशी ठरल्याच्या निषेधार्थ डेमॉक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने मंगळवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अंकली टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक अडकून पडली होती. निवेदन स्वीकारण्यास संबंधित विभागाचे अधिकारी न आल्याने निषेध करून गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर ‘पायताण मोर्चा’ काढण्याचा इशारा देण्यात आला. डॉ. नरेंद्र दाभोळकर व गोंविद पानसरे यांची हत्या करणारे अजून मोकाटच आहेत. लवकरात लवकर सीबीआय चौकशीद्वारे मारेकऱ्यांना अटक करावी, या मागणीसाठी सांगली-कोल्हापूर महामार्गावर उदगाव येथील अंकली टोलनाक्याजवळ मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले. एक तासाहून अधिक वेळ महामार्ग रोखून धरण्यात आला होता. यावेळी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी रघुनाथ देशिंगे म्हणाले, समाजाला दिशा देणाऱ्या पानसरे व दाभोळकर यांची हत्या सुपारी देऊन झाली आहे. मारेकऱ्यांना अटक करण्यात शासन अपयशी ठरल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. सुभाष साठे म्हणाले, आता गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पायताण मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी बळ द्यावे, असे आवाहन केले.यावेळी रमेश शिंदे, रघुनाथ देशिंगे, राजेश शिंदे, सुनील शेळके, अ‍ॅड. संभाजीराजे नाईक, विनायक कांबळे, प्रमोद तिवडे, शंशिकांत साठे, महेश तिवडे, नितीन बागे, पिंटू पवार, किरण कांबळे, तानाजी सोनुर्ले, मनू नलवडे, गणेश तिवडे, श्रीपती सावंत, सचिन साठे, कार्यकर्ते उपस्थित होते. ेशासनाचा प्रतिनिधी फिरकला नाहीशिरोळ तहसील कार्यालयाला पूर्वसूचना देऊनही शासनाचा एकही प्रतिनिधी आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्यामुळे शासनाचा निषेध म्हणून साडी-चोळी, बांगड्यांचा आहेर देऊन बोंबठोक आंदोलन करण्यात आले. पोलीस उपाधीक्षक सरवदे व सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक दूर केली.