शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गमानवाडची बॉक्साईट वाहतूक बंद

By admin | Updated: December 19, 2014 23:53 IST

ट्रकमालकांची तक्रार : हिंडाल्को कंपनी आणि कामगार वादाचा चारशे ट्रकना फटका

सरवडे : दुर्गमानवाड (ता.राधानगरी) येथील हिंडाल्को कंपनी आणि कामगार यांच्यातील वादाचा फटका चारशे ट्रकमालकांना बसत आहे. त्यामुळे दररोज किमान एकतरी बॉक्साईट ट्रीप बसावी यासाठी असोसिएशनच्यावतीने बॉक्साईट वाहतूक बंद केली आहे. तर ट्रान्स्पोर्टचालकांनी सोमवारपासून बॉक्साईट भरण्यासाठी ट्रक पाठवण्याची तयारी केल्याने ट्रान्स्पोर्ट व ट्रकमालक वाद चिघळला आहे.दुर्गमानवाड येथून बेळगावला १ जानेवारी १९९४ पासून बॉक्साईट वाहतूक सुरू आहे. सुरुवातीच्या काळात कंपनीला लोकप्रतिनिधी, संघटना, अनेक गावांच्या संघर्षाला सामोरे जावे लागले. तर न्यायालयीन लढाही झाला. त्यानंतर कंपनीने लोकप्रतिनिधींसह, पत्रकार, संघटना, पक्ष, अधिकारी यांना ट्रकचा कोठा दिला. त्यामुळे संघर्षाची धार बोथट झाली आणि बॉक्साईट वाहतूक जोमाने सुरू झाली. यावर्षी १७० ट्रान्स्पोर्टच्या नावाने ४०० ट्रकच्या साहाय्याने बॉक्साईट वाहतूक सुरू होते. पूर्वी ओव्हरलोड माल भरला जात होता. मात्र, अलीकडे अतिरिक्तमाल नेण्याचे बंद असून, प्रत्येक ट्रक दहा टनच माल भरतो. सध्या कंपनीचा दर प्रतिटन ७३१ रुपये असा आहे.कंपनीच्या मशीनवर काम करणाऱ्या २० कामगारांना पगारवाढ हवी आहे. त्या वादातून ट्रक भरण्यासाठी ते टाळाटाळ करीत आहेत. तर आठ तासांची पाळी असल्याने सुमारे शंभर ट्रकच भरतात. त्यामुळे सध्या दोन-तीन दिवसानंतर ट्रीप मिळत आहे. पर्यायाने ट्रकमालकांना तोटा सहन करावा लागत असल्याने ट्रकमालक असोसिएशनच्यावतीने बॉक्साईट वाहतूक काही दिवसांपासून बंद आहे, असे असो.चे अध्यक्ष बाळासाहेब किरुळकर यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीने कर्मचारी व ट्रकमालकांच्या न्याय मागणीचा विचार न करता व उलट ट्रान्स्पोर्टस् चालकांना कंपनीकडे नोंद केलेले वाहन बॉक्साईट भरण्यास पाठवावे, असे सांगितल्याचे समजते. त्यामुळे ट्रान्स्पोर्ट व ट्रकमालक वाद चिघळत आहे. (वार्ताहर)