शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

आकसातूनच आरोप, दिशाभूल थांबवा!

By admin | Updated: July 16, 2015 21:38 IST

किरण कदम यांचे प्रत्युत्तर : विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार जनता दलाला नाही

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहराच्या विकासावर बोलण्याचा नैतिक अधिकार जनता दलाला नाही. आकसातूनच आमदार हसन मुश्रीफ व ‘राष्ट्रवादी’वर खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करणे त्यांनी थांबवावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते नगरसेवक किरण कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.आठवड्यापूर्वी मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत पालिकेतील ‘सत्तांतरा’बाबत टीका-टिप्पणी केली होती. त्यास जनता दलाने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याला राष्ट्रवादीने उत्तर दिले.२००६-११ या कालावधीत स्वाती कोरी यांच्या आघाडीने किती चोख काम केले आहे, हे गडहिंग्लजकरांना माहीत आहे. त्याचे उत्तर म्हणूनच जनतेने ‘राष्ट्रवादी’कडे सत्ता दिली. म्हणूनच मुश्रीफ यांनी शहरासाठी १०० कोटी निधी देण्याचा संकल्प केला. त्याच्या पूर्ततेची धमक त्यांच्यात आहे.गतवेळी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निधी नसतानाही साडेतीन कोटींची कामे ‘जनता दल-जनसुराज्य’ आघाडीने केली होती. तो पहिल्या वर्षातच भरून काढला. त्यांनी अर्धवट सोडलेली सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण केली. लक्ष्मी यात्रेत शहरातील ९० टक्के रस्ते डांबरी केले.तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ५ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर झाला. वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी ६४ लाख शिल्लक असताना १ कोटी ६३ लाख शिल्लक असल्याचा खोटा आरोप झाला आहे. १० कोटींचा बहुउद्देशीय हॉलचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे तयार आहे, तसेच योग विद्याधामचा एक कोटीचा प्रस्ताव शासकीय मंजुरीसाठी पाठविला आहे.राष्ट्रवादीने सुंदराबाई बिलावरांना दोनवेळा नगरसेवक व उपनगराध्यक्षपदी बसविले. ‘लक्ष्मी’ दर्शनातूनच त्या विरोधकांना सामील झाल्या असतानाही त्यांच्यावर अन्याय झाल्याचे कोरी सांगत आहेत. बिलावरांनी त्यांना वटमुखत्यारपत्र दिले आहे का? असा सवालही कदम यांनी केला. उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, गटनेते रामदास कुराडे व राष्ट्रवादीचे नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘चौकशी’ला सामोरे जाण्यास तयारघनकचरा प्रकल्पासाठी ४३ लाखांची मशिनरी रीतसर मंजुरीनेच बसविली आहे. तरीदेखील विरोधकांनी चौकशीची मागणी केली आहे. सहा महिने वीजकनेक्शन अभावी व त्यानंतर पावसाळ्यामुळे मशिनरी बंद आहे. कचऱ्यावर प्रक्रियेचा हा राज्यातील पहिला यशस्वी प्रकल्प आहे. त्याबाबतच्या कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असेही कदम यांनी स्पष्ट केले.‘मीटर’चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न२०१० मध्ये नागरिकांनी स्व:खर्चाने नळांना मीटर बसवून घ्यावीत अशी सूचना कोरी यांनीच पालिकेच्या सभेत केली होती. आम्ही सत्तेवर आल्यानंतर मीटर मोफत बसविण्याचा ठराव केला, त्यासाठी १३ व्या वित्त आयोगातून एक कोटीहून अधिक रक्कम ठेवली आहे. मात्र, मोफत मीटरची घोषणा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत, असा आरोप कदम यांनी केला.